विकृतीवर कठोर कारवाई होणार; शिवरायांच्या पुतळ्याला जोल्लेंचा दुग्धाभिषेक

सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांना कठोर शासन देण्यासाठी सरकार कटीबध्द ; मंत्री शशिकला जोल्ले
Shashikala Jolle
Shashikala JolleEsakal
Updated on

निपाणी : छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतीवीर संगोळी रायण्णा (Sangolli Rayanna) ही व्यक्तीमत्वे जगासाठी आदर्शवत आहेत. राष्ट्रपुरुषांच्या नावाचा गैरवापर करून समाजातील शांतता, सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रय़त्न कुणीही करू नये. बंगळूर व बेळगाव (Bengalur, Belguam) येथील घटना सरकारने गंभीरपणे घेतल्या असून कायदा आणि सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांना कठोर शासन देण्यासाठी सरकार कटीबध्द असल्याचे प्रतिपादन धर्मादाय, वक्फ व हज मंत्री शशिकला जोल्ले (Shashikala Jolle)यांनी केले.

शनिवारी (ता. १८) सकाळी येथील छत्रपती शिवाजी चौकात (Chhatrapati Shivaji Chowk) मंत्री जोल्ले यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला. तत्पूर्वी मंत्री जोल्ले यांनी अक्कोळ क्राॅसवरील संगोळी रायण्णा सर्कलमध्ये संगोळी रायण्णा यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर शिवाजी चौकात झालेल्या कार्यक्रमात नगराध्यक्ष जयवंत भाटले (Jaywant Bhatle)यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी उपस्थितांनी बंगळूर व बेळगाव येथील विटंबना घटनेचा निषेध केला.

Shashikala Jolle
मिरजेत गाड्यांवर दगडफेक: कानडी फलकांची नासधूस; 9 जणांविरुद्ध गुन्हा

छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यावर मंत्री जोल्ले म्हणाल्या, निपाणी, (Nipani) बेळगाव परिसर सीमेवर असून येथे सर्व लोक सौहार्दतेने नांदतात. मात्र काही मोजक्या लोकांच्या विकृतीमुळे संपूर्ण समाज, परिसर वेठीस धरला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांनी आपल्या काळात राष्ट्र उभारणीसह समाज निर्मितीमध्ये योगदान दिले आहे. त्यांच्या पावित्र्याला धोका पोचणार नाही, याची जबाबदारी सर्वांची आहे.

नगराध्यक्ष जयवंत भाटले, गोपाळ नाईक, बाबासाहेब खांबे, उदय शिंदे, प्रणव मानवी यांनी घटनेबद्दल संताप व्यक्त करून दोषींवर सरकारने कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी उपनगराध्यक्षा निता बागडे, सभापती सद्दाम नगारजी, नगरसेवक राजू गुंदेशा, संतोष सांगावकर, दीपक पाटील, संतोष माने, उदय नाईक, विनायक वडे, नगरसेविका सोनल कोठडिया, आशा टवळे, उपासना गारवे, कावेरी मिरजे, प्रभावती सूर्यवंशी, राणी शेलार यांच्यासह सिध्दू नराटे, सुरेश शेट्टी, बंडा घोरपडे, सुभाष कदम, विशाल गिरी, अभि कासार, महेश सूर्यवंशी, विशाल गिरी, राजेश कोठडिया, प्रसाद औंधकर, शेरगुल पठाण, मैनुद्दीन मुल्ला, रमेश वैद्य, सुनील राऊत, संजय चिकोडे, आकाश माने, महादेव चव्हाण यांच्यासह शिवभक्त व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.