संकेश्वर : बेंगळुर येथील शिवपुतळ्याची (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) विटंबना करणाऱया समाजकंटकांना पोलिस खात्याने त्वरीत अटक करून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी येथील शिवप्रेमी नागरिकानी शनिवारी (ता. १८) केली. येथील छत्रपती शिवाजी चौकात शहर व परिसरातील हजारो शिवप्रेमी नागरिकांनी जमून या घटनेचा निषेधाच्या (Protest) घोषणा दिल्या. तसेच प्रमुख मार्गावरून निषेध फेरी काढली. शिवाजी चौकात फेरीची सांगता करून सभा घेण्यात आली. यावेळी शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून विधीवत पूजन करण्यात आले.
यावेळी सुभाष कासारकर म्हणाले, राष्ट्रपुरुषांचा अवमान आम्ही कदापीही सहन करणार नाही. सबंधित समाजकंटकांना पोलिस खात्याने त्वरीत अटक करून शिक्षा ठोठवावी. अन्यथा आम्हालाच त्याचा शोध घेऊन शिक्षा करावी लागेल.
जयप्रकाश सावंत, अप्पासाहेब मोरे यांनीही आपले विचार मांडले. यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनूरे, अॅड. विक्रम करनिंग, दीपक भिसे, ए. पी. चौगला, शाम यादव, समीर पाटील, महेश मिलके, नेताजी आगम, शिवपुत्र आरभावी, शिवानंद बरगे, पुष्पराज माने, युवराज मोरे, विवेक मोरे, मनोज देसाई, प्रकाश इंगळे, सुनील मोकाशी, सचिन मोकाशी, अविनाश नलवडे, गजू मोकाशी, संदीप दवडते, संदीप गोंधळी, गणेश यादव यांच्यासह परिसरातील हजारो शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
हिटणी नाक्यावर ठिय्या
महाराष्ट्राच्या सीमेवर हिटणी नाक्यावर महाराष्ट्रातील शिवप्रेमी नागरिकांनी ठिय्या आंदोलन करून कर्नाटकातील वाहने रोखून धरण्यात आली. यावेळी अनुचित प्रकार होऊ नये, याकरिता चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.