महाराष्ट्रातील कन्नडिगांना मिळणार संरक्षण; बोंम्मई यांची माहिती

महाराष्ट्रातील कन्नडिगांचा मुख्यमंत्र्यांना पुळका
Basavaraj Bommai
Basavaraj Bommaiesakal
Updated on

बेळगाव : महाराष्ट्रातील कन्नडीगांचा पुळका कर्नाटक (Karnatka) सरकरला आला आहे. महाराष्ट्रातील कन्नड भाषिक व त्यांच्या मालमत्तेचे रक्षणाबाबत कर्नाटकाच्या गृह खात्याचे सचिव आणि पोलीस महानिरीक्षकांनी महाराष्ट्र राज्य सरकारच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बातचीत केल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोंम्मई (Basavaraj Bommai)यांनी सोमवारी (ता.20) बेळगावात (Belguam) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बेंगलोरला छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) व बेळगावमध्ये संगोळी रायन्ना (Sangolli Rayanna) यांच्या पुतळ्यांची विटंबना झाल्यानंतर बेळगावात तणावस्थिती आहे. निषेध, बंद आणि निदर्शने करण्यात येत आहेत. त्यावरून पोलिसांनी धरपकड आणि 32 जणांना अटक केली आहे. निष्पाप विरोधात गुन्हे नोंदविले आहेत. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असून कन्नड भाषिकांची वाहने आणि मालमत्ताची हानी काही ठिकाणी झाली आहे.

Basavaraj Bommai
Belgaum: शिवराय पुतळा विटंबना प्रकरणी 7 जणांना अटक, 27 जणांवर कारवाई

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राज्याच्या गृहसचिव आणि पोलीस महानिरीक्षकांनी महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून महाराष्ट्रातील कन्नड भाषिकांचे रक्षण केले जावे. वाहन आणि मालमत्ता नुकसान थांबविले जावे, अशी मागणी केल्याचे सांगितले.तसेच बेंगलोर व बेळगाव मधील घटनेनंतर पोलिसांनी कारवाई हाती घेतली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. दंगल वा प्रक्षोभक वातावरण निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांकडून निर्णायक पावले उचलली जात असल्याचेही मुख्यमंत्री बोम्मई यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.