राजकारणात कोण "परमनंट' नसते - मुख्यमंत्री फडणवीस

राजकारणात कोण "परमनंट' नसते - मुख्यमंत्री फडणवीस
Updated on

कागल - कोणत्याही क्षेत्रात कोण "परमनंट' नसते, राजकीय क्षेत्रात जे रस्ता भरकटत गेले अशा अनेक दिग्गजांना जनतेने घरी बसवले आहे. राजकारणात पाच वर्षासाठी जनता निवडून देते, पण काही लोक स्वतःला अमरत्त्व प्राप्त झाल्यासारखे जगतात, पण त्यांनी तसे समजू नये, राजकारणात कोण "परमनंट' नसते, असा टोला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना त्यांचे नांव न घेता लगावला. 

कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक कै. विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण आज एका शानदार कार्यक्रमात झाले. त्यानंतर झालेल्या विराट शेतकरी मेळाव्यात श्री. फडणवीस बोलत होते. महाराष्ट्रात राजर्षी शाहू महाराजांनी नव महाराष्ट्राची निर्मिती केली. "बहुजन हिताय, बहुजन सुखाय' या मार्गांनी महाराजांनी काम केले. त्यातून एक परंपरा सुरू झाली आणि या परंपरेचे पाईक म्हणून अनेकांनी काम केले, अशांनी आपल्या कतृत्त्वातून महाराष्ट्र घडवला. त्यात कै. विक्रमसिंह घाटगे यांचे नांव घेता येईल, असेही श्री. फडणवीस म्हणाले. 

कै. घाटगे यांनी शाहू महाराजांचे ब्रीद वाक्‍य सांभाळले - मुख्यमंत्री

श्री. फडणवीस म्हणाले,"कै. घाटगे यांचा वारसा समरजितसिंह घाटगे समर्थपणे चालवत आहेत. एखाद्या पित्याला आपल्या पुत्राचे कतृत्त्व दिसत असेल तर त्यावेळी त्यांना देखील आनंद होत असले. त्यांच्या शिदोरीवर समरजितसिंह यांचे मार्गक्रमण चांगल्या पध्दतीने होणार आहे.कै. घाटगे यांच्या सामाजिक काम हे मुख्य होते, राजकीय कार्य हे बाय प्रोडक्‍ट होते, त्यात फारसे अडकून पडले नाही. लोकशाहीच्या मंदीरात असो किंवा नसो जनतेचे आपण जनतेचे उत्तरादायित्त्व आहोत या भावनेतून त्यांनी काम केले. ही प्रेरणा त्यांना राजर्षी शाहू महाराजांकडून मिळाली. कै. घाटगे यांनी शाहू महाराजांचे ब्रीद वाक्‍य सांभाळले म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात संस्थांची उभारणी ते करू शकले.' 

राजकारणात अनेक प्रसंग येतात, अशा प्रसंगात आपण धैर्य सोडत नाही, आपण फक्त काम करत राहातो, त्यावेळी समाजही मागे उभे राहातो. समोर बसलेला समाज समरजितसिंह घाटगे हे योग्य मार्गाने चालत असल्याची साक्ष देतो. गेल्या पाच वर्षात समरजितसिंह यांनी काम करताना दुसऱ्याची रेषा न पुसता आपली रेषा मोठी करण्याचे काम  केले. हेच कै. घाटगे यांना अपेक्षित होते, त्यामुळेच समाज त्यांच्या मागे उभा आहे.  

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

कै. घाटगे यांनी संस्थातून समजाचे परिवर्तन घडवले

श्री. फडणवीस म्हणाले,"क्रिडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी काम केले. कै. घाटगे यांचे संपूर्ण आयुष्य बघितले तर इतक्‍या संस्था स्थापन करून त्यांनी समाजाचे परिवर्तन करण्याचे काम केले. हे सर्व करत असताना त्यांची संवेदनशीलताही महत्त्वाची आहे. कर्णबधिर मुलांची शाळा असो किंवा अनाथ मुलांसाठी शाळा असो त्यातून राजे किती संवेदनशील होते हे दिसून येते.

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.