चिक्कोडी : 'अमृत'साठी 'चिक्कोडी'तील ४ ग्रा. पं. ची निवड

चंदूर, करोशी, पट्टणकुडी, जोडकुरळीचा समावेश : संपूर्ण विकासाचे उद्दिष्ट
ग्रामपंचायत
ग्रामपंचायतsakal
Updated on

चिक्कोडी : स्वातंत्र्योत्सवाच्या अमृत महोत्सवानिमित्त अमलात आणलेल्या अमृत योजनेसाठी चिक्कोडी तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. त्यात चंदूर, करोशी, पट्टणकुडी आणि जोडकुरळी गावांचा समावेश आहे. त्याद्वारे गावांचा संपूर्ण विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील 59 ग्रामपंचायतींसह राज्यातील 750 ग्रामपंचायतींची या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे.

या गावांमधील शाळा आणि अंगणवाड्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देणे, शौचालय बांधणे, शाळेच्या आवारातील मैदानाचा विकास करणे, कंपाउंड निर्माण करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. तसेच विविध योजना एकाच ठिकाणी राबवण्यात येणार असल्याने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गावातील प्रत्येक घरांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. निर्धारीत वेळेत योजना पूर्ण केलेल्या पंचायतींना 25 लाखांचे प्रोत्साहन धन देण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत
INDvsNZ : भारत-न्यूझीलंड संघाविरुद्ध हरला तर...

खेड्यातील नागरिकांचे जीवन सुधारण्यासाठी सरकारने ध्येय बाळगले आहे. त्यानुसार अमृत योजनेंतर्गत विविध योजना अमलात आणून गावचा विकास करण्यात येत आहे. तसेच गावामध्ये आवश्यक असलेल्या सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत. डिजिटल ग्रंथालयद्वारे विद्यार्थी आणि युवकांना अभ्यासासाठी मदत होणार आहे.

बेळगाव, हुक्केरी आणि खानापूर तालुक्‍यातील सर्वाधिक सहा ग्रामपंचायतींची या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्वात कमी कागवाड तालुक्यात दोन ग्रामपंचायतची निवड झाली आहे. तर चिक्कोडी तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत
पुण्यात बनवला चॉकलेटचा किल्ला; चॉकलेट फटाके ही उपलब्ध

गावचे चित्रच पलटणार

योजनेतून पथदीप बसविणे, प्रत्येक घरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, 100 टक्के कचऱ्याची विल्हेवाट, ग्रामपंचायतींच्या इमारतींवर सौर विद्युत घटक बसविणे, डिजिटल ग्रंथालयाची निर्मिती, वसतीरहित कुटुंबांना घरांचे वितरण करण्याबरोबरच विविध कामे होणार आहेत. या योजना जारी केल्यानंतर गावचे चित्रच पलटणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.