चिक्कोडी : सध्या कृष्णा नदीला महाराष्ट्रातून येणारे पाणी खालावल्याने पिण्याच्या पाण्यासह शेती पाण्यासाठी उन्हाळ्यात समस्या निर्माण होत असल्याने विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी तातडीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. सीमाभागात जादा पाणी सोडण्याची विनंती केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच कृष्णानदीच्या पात्रात पाणी सोडण्याची अधिकाऱ्यांना सूचना केली.
कृष्णा नदीतील पाणी कमी झाल्याने बेळगाव, विजापूर, बागलकोट जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरिकांना पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. जनावरांच्या पाण्यासह पिण्यासाठी पाणी आणण्याकरिता वणवण होत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पिकांना पाणी नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
अशा अनेक समस्या विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडल्या असून त्यासाठी किमान तीन टीएमसी पाणी कृष्णेत सोडण्याची विनंती केली. फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत वारणा व कोयना जलाशयातून तीन टीएमसी पाणी सोडण्यास सांगितले.
कृष्णा नदीच्या पाण्याची समस्या मे महिन्यापर्यंत शेतकरी व नदीकाठच्या ग्रामीण भागांना महत्त्वाचे असून शेती पिकांना दिलासा मिळणार आहे. गरीब जनतेचा पाण्यामुळे फायदा होण्यास मदत होईल. यावेळी चंदूरचे अनिल पाटील, कल्लोळचे रवींद्र मिरजे, केरुरचे मल्लिकार्जुन पाटील व नागरिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.