जत (जि. सांगली) ः शहरात नागरी सुविधात प्रमुख ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्राची निर्मिती करणे व लहान मुलांना उद्यानात वेळ घालवता यावा, असे ठिकाण नगरपरिषदेकडून विकसित करणे आवश्यक आहे. मात्र, जत सांगली रोडवर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान व विद्यानगर येथील बालोद्यान सुविधांच्या प्रतिक्षेत आहे. शहरात मुलांच लहानपण हरवतयं की काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, लाखो रूपये खर्च करून अद्याप ही उद्याने ओसाड आहेत. मात्र, काही मोजक्याच नगरसेवकांच्या इच्छेसाठी विजापूर रोड व दत्त कॉलनी, विद्यानगर येथे नव्या उद्यानांना मंजूरी मिळाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे जुने दुर्लक्षित व नव्याचा डामडोल, असाच प्रकार समोर येत आहे.
यापूर्वी सन 1995 मध्ये युती सरकारच्या काळात तत्कालीन ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी ग्रामपंचायतीच्या काळात विद्यानगर येथे बालोद्यानाचे उद्घाटन केले.
सद्या त्या ठिकाणी रात्री मद्यपींचा अड्डा तर दिवसा फिरती जनावरांचे वास्तव्य असते. त्यामुळे लाखो रूपये खर्चून याकडे दुर्लक्ष करणे, जतकरांसाठी गैरसोयीचे ठरत आहेत. तर याठिकाणी कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत. या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. मुलांनी खेळावे कुठे, असा प्रश्न पडला आहे.
जत सांगली महामार्गालगत पाणी शुद्धीकरण केंद्रासमोर नगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची निर्मिती केली. परंतू तेथे कोणत्याही सुविधा नाहीत. उद्यान निरूपयोगी बनले आहे. दुरवस्थेमुळे मुलांचा हिरमोड होत आहे. सर्व खेळणी तुटली असल्याने मुलांना घेऊन जाणे गैरसोयीचे ठरत आहे. पालिकने याची दुरूस्ती करावी, अशी मागणी आहे.
घरे बनली कोंडवाडा
जत शहरात लहान मुलांना मोकळेपणाने खेळता यावे, बागडता यावे तसेच ज्येष्ठांना हक्काचे विरूंगळा केंद्र असावे, अशा अपेक्षा आहेत. उद्यानातील गैरसोयी, त्यात ऑनलाईन शिक्षण यांमुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. मुलांचा आपल्याच घरातच कोंडवाड्यात ठेवल्याप्रमाणे राहत आहेत सुजाण लोकप्रतिनिधी व प्रशासन दखल घेईल का? अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.