Eknath Shinde : 'आमच्या कार्यकाळात संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही'; असं का म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

CM Eknath Shinde : ‘‘साधू संत घरी येतात, तोच दिवाळी, दसरा असतो. संत समावेश सोहळ्यामुळे यंदा दसरा नवरात्रोत्सवाच्या आधीच आला आहे.''
CM Eknath Shinde
CM Eknath Shindeesakal
Updated on
Summary

समाजात जातीय तेढ निर्माण करून विष पेरण्याचे काम सुरू आहे. यावर संतांच्या विचारांची संजीवनी प्रभावी ठरणार आहे.

कोल्हापूर : समाजामध्ये जातीय विष पेरण्याचे काम सुरू आहे. सामाजिक सलोख्याची संजीवनी संतांकडे आहे. हिंदुत्वावर (Hindu Community) हल्ला करणाऱ्या टोळक्यांचे निर्दलन करण्यासाठी संतांचे विचार प्रभावी आहेत. शासनाच्या योजना जनतेपर्यंत नेण्यासाठी प्रवचने, कीर्तने उपयोगी आहेत. राजसत्तेला धर्मसत्तेच्या आशीर्वादाची गरज आहे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले.

कणेरी येथील सिद्धगिरी मठावर (Siddhagiri Math Kaneri) सुरू असणाऱ्या संत समावेश सोहळ्याच्या समारोपात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘साधू संत घरी येतात, तोच दिवाळी, दसरा असतो. संत समावेश सोहळ्यामुळे यंदा दसरा नवरात्रोत्सवाच्या आधीच आला आहे. संतांची शिकवण जगण्याचा मार्ग दाखवते. समाजात जातीय तेढ निर्माण करून विष पेरण्याचे काम सुरू आहे. यावर संतांच्या विचारांची संजीवनी प्रभावी ठरणार आहे. गोशाळा, संत, महंत यांचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. संस्कृती, परंपरा जोपासली पाहिजे. आपण कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही; पण आपल्या धर्मावर होणारे हल्ले कसे सहन करायचे?’’

CM Eknath Shinde
'भाजपच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात एकही जातीय दंगल झाली नाही'; आमदार देशमुखांचा प्रणिती शिंदेंवर पलटवार

ते म्हणाले, ‘‘शेतकरी, महिला, विद्यार्थी, तरुण, कामगार, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व समाजघटकांसाठी राज्य सरकारने केवळ अडीच वर्षांत अनेक निर्णय घेतले. या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे पुण्यकार्य संतांनी प्रवचन, कीर्तनाच्या माध्यमातून करावे. राजसत्तेला धर्मसत्तेच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. आमच्या कार्यकाळात संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही. मठ, मंदिरांचे संरक्षण, वारकऱ्यांना सोयीसुविधा देणे हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो.’’

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचा पुंगनूर गाय देऊन सत्कार करण्यात आला. अदृश्य काडसिद्धेश्वर महाराजांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर रामगिरी महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. सनातन विचारांसोबत असणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी निरंजननाथ महाराज, माणिक मोरे महाराज, राणा महाराज वास्कर, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक आघाडीप्रमुख अक्षय महाराज भोसले, देवरथ वास्कर महाराज, गहिनीनाथ महाराज, खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक, माजी आमदार चंद्रदीप नरके उपस्थित होते.

CM Eknath Shinde
Devendra Fadnavis : 'गो-माता-सनातन धर्माचे आम्ही रक्षणकर्ते आहोत, धर्माच्या लढाईत सत्याच्या विजयासाठी संतांनी जागर करावा'

ठराव आणि मागण्या

  • देशी गाय राज्यमाता निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

  • धार्मिक ठिकाणांना तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या. तेथे मद्य व मांस विक्रीवर बंदी घाला

  • महाराष्ट्राच्या सीमेवर संतभूमी, वीरभूमी असे फलक लावा

  • मंदिरांवरील सरकारी नियंत्रण काढा

  • शालेय अभ्यासक्रमात संत साहित्याचा समावेश करावा

  • शालेय पोषण आहार शाकाहारी असावा

  • इंद्रायणी, चंद्रभागा प्रदूषणमुक्त कराव्यात

  • संत विद्यापीठ स्थापन करून वारकरी संस्थांना संलग्न करावे

  • धार्मिक सणांचे विकृतीकरण थांबवावे

  • कीर्तनकारांनी पाच गावे दत्तक घ्यावीत

  • दुकानांमध्ये श्रीरामाची प्रतिमा लावावी

  • हलाल प्रमाणपत्रावर बंदी घालावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.