आलमट्टी धरणामुळे सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत येऊ शकतो महापूर? CM शिंदेंनी अधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

सांगली- कोल्हापूर जिल्ह्यांत महापूर (Kolhapur Flood) येऊ नये, यासाठी धरणातील विसर्ग करताना सतर्क राहा.
Eknath Shinde Almatti Dam
Eknath Shinde Almatti Damesakal
Updated on
Summary

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘या वर्षी राज्यात मॉन्सूनची (Monsoon) स्थिती चांगली असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण अधिक असेल.'

कोल्हापूर : ‘सांगली- कोल्हापूर जिल्ह्यांत महापूर (Kolhapur Flood) येऊ नये, यासाठी धरणातील विसर्ग करताना सतर्क राहा. आलमट्टी धरणातील (Almatti Dam) विसर्गाबाबतही समन्वय ठेवा. आंतरराज्य बैठक घेऊन विसर्ग करण्याबाबत निर्णय घ्या, जेणेकरून महापूर नियंत्रणात राहील’, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्या. आज त्यांनी राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

कोल्हापुरातून या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे (Collector Amol Yedge) यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘या वर्षी राज्यात मॉन्सूनची (Monsoon) स्थिती चांगली असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण अधिक असेल. अशा वेळी महापुराची स्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व यंत्रणा सज्ज ठेवा. कर्नाटकातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घ्या. आलमट्टी धरणावर एक जलअभियंत्याची नियुक्ती करा. राज्यातील धरणातून विसर्ग करताना समन्वय ठेवा.

Eknath Shinde Almatti Dam
तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी होतो 60 लाख लोकांचा मृत्‍यू; 2030 पर्यंत जगात 80 लाखापेक्षा जास्‍त लोक गमावणार जीव!

महापुराची स्थिती उद्भवल्यास निवारा केंद्रे सर्व सुविधांनी सज्ज ठेवा. पूरग्रस्तांना चांगले अन्न, औषधे यांची व्यवस्था करा. जनावरांना चारा कमी पडणार नाही, याची काळजी घ्या. पुराची तीव्रता वाढल्यास तातडीने नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करा. एनडीआरएफ पथके तैनात करा. विद्युतपुरवठा आणि दूध्वनी व्यवस्था ठप्प होणार नाही, यासाठी उपाययोजना करा.

महापुराच्या काळातही पिण्याचा पाणीपुरवठा सुरळीत राहील, याचीही खबदरारी घ्या. ज्या गावांना, नागरी वस्तींना भूस्खलनाचा धोका आहे तेथे तातडीने उपाययोजना करा.’ या बैठकीला महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जलसंपदाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Eknath Shinde Almatti Dam
नातीचा वाढदिवस साजरा करुन परतताना काळाचा घाला! तासगाव-मणेराजुरी मार्गावर कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील 6 जण ठार

या उपाययोजना अत्यावश्यक

  • धोक्याची सूचना देणारी सार्वजिक व्यवस्था सक्रिय करा.

  • पूरग्रस्त गावांमधील नागरिकांना योग्यवेळी सुरक्षितस्थळी पोहोचवा.

  • धरणातील विसर्ग करताना समन्वय ठेवा.

  • वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणार नाही, याची काळजी घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.