डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या (Chandrahar Patil) वतीने अंबाबाई देवीच्या यात्रा व बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
शिरढोण : शिरूर (ता. अथणी, जि. बेळगाव) येथील हेलिकॉप्टर बैज्या-बुलेट छब्या या बैलजोडीने प्रथम क्रमांक मिळवत २२ लाखांची ‘थार’ गाडी जिंकली; तर कोल्हापूर येथील हरण्या-तांबडा हरण्या या बैलजोडीने द्वितीय क्रमांक पटकावला आणि ट्रॅक्टरचा मानकरी ठरला.
चंद्रहार दादा यूथ फाउंडेशनतर्फे (Chandrahar Dada Youth Foundation) मुख्यमंत्री केसरी बैलगाडी शर्यतीचे (CM Kesari Bullock Cart Race) आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत टोल नाक्याजवळ या बैलगाडी शर्यती पार पडल्या. बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन आणि अंबाबाई यात्रेनिमित्त मुख्यमंत्री केसरी बैलगाडी स्पर्धा देशिंग, हरोली (ता. कवठेमहांकाळ) येथे पार पडल्या.
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या (Chandrahar Patil) वतीने अंबाबाई देवीच्या यात्रा व बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या बैलगाडी शर्यतीला लाखांहून अधिक बैलगाडी शर्यतीमध्ये महाराष्ट्रातील व कर्नाटक मधील शर्यती शौकिनांनी पाहण्यासाठी हजेरी लावली. हरोली-देशिंग या माळावर बऱ्याच वर्षांपूर्वी दसऱ्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात बैलगाडी शर्यतीचे मैदान भरत होते. मात्र ही बैलगाडी शर्यत बंद झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनंतर डबल केसरी चंद्रहार पाटील यांनी याच माळावर मोठ्या प्रमाणात बैलगाडी शर्यत भरवली. या शर्यतीसाठी हजारांवर शौकिनांच्या उपस्थितीत येथे बैलगाडी शर्यतीचा थरार पार पडला.
बैलांची तपासणी करून डॉक्टरांनी फिटनेस प्रमाणपत्र दिल्यावर बैलगाडी शर्यती सोडण्यात आल्या. तसेच बैलगाडी शर्यती ३० एकर परिसरातील देशिंग, हरोलीच्या माळरानावर ऐतिहासिक बैलगाडी स्पर्धा पार पडल्या. या माळावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, भास्कर जाधव, प्रा. नितीन बानगुडे-पाटील, डबल केसरी चंद्रहार पाटील, आदित्य ठाकरे यांचे मोठे डिजिटल लावण्यात आले होते. शौकिनांना बसून शर्यती पाहण्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. तसेच या ठिकाणी मोठे स्क्रीन लावण्यात आले होते. तसेच शर्यतीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातून अनेक बैलगाडी स्पर्धक व शर्यती शौकीन भरउन्हात शर्यती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. वेगवेगळ्या गटातून पार पडलेल्या शर्यतीनंतर चुरशीच्या अंतिम जनरल बैलगाडी शर्यती हेलिकॉप्टर बैज्या आणि बुलेट छब्या या बैलजोडीनं प्रथम क्रमांकाची ‘थार’ गाडी पटकावली. कोल्हापूरच्या हरण्या बैलजोडीनं द्वितीय क्रमांक मिळवत ट्रॅक्टरचा मानकरी झाला. यामध्ये थार, ट्रॅक्टर, बुलेट मोटारसायकल, मोटर सायकल अशी बैलगाडी शर्यतीमध्ये बक्षिसे ठेवण्यात आली होती. या परिसरामध्ये पहिल्यांदाच या बक्षिसासह शर्यती पार पडल्या.
यावेळी प्रा. नितीन बानगुडे-पाटील, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, संजय विभूते, मारुती पवार, हिंदकेसरी संतोष वेताळ, बजरंग पाटील, अभिजित पाटील, अण्णासाहेब कोळेकर, आप्पासाहेब कोळेकर, मनोहर सारडा, संजय चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने शर्यत शौकीन उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.