Kiran Samant Sindhudurg Lok Sabha: युतीतील धुसफूस थांबली? राणेंचा खासदारकीचा मार्ग मोकळा! किरण सामंतांच्या फेसबूक पोस्टमुळे खळबळ

Kiran Samant Sindhudurg Lok Sabha: शिवसेना शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्याची चर्चा राजकारणात सुरू झाली. याचे कारण म्हणजे त्यांनी सोशल मिडीयावर केलेली पोस्ट.
Kiran Samant Sindhudurg Lok Sabha
Kiran Samant Sindhudurg Lok SabhaEsakal
Updated on

Kiran Samant Sindhudurg Lok Sabha: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. अशातच जागावाटप आणि उमेदवारींवर मोठा पेच निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्याची चर्चा राजकारणात सुरू झाली. याचे कारण म्हणजे त्यांनी सोशल मिडीयावर केलेली पोस्ट.

शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर दावा केला होता. मात्र, त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टनुसार येथून माघार घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट दिसून येत आहे. दरम्यान भाजप आणि शिवसेना पक्षातील नेत्यांनी या मतदार संघात दावे केले होते.

Kiran Samant Sindhudurg Lok Sabha
मराठा तरुणांसाठी खुशखबर! नोकरी, शिक्षणासाठी आता ‘SEBC’चे प्रमाणपत्र 12 ते 15 दिवसांत; सोलापूर जिल्ह्यातील 327 जणांना 15 दिवसांत प्रमाणपत्र वितरीत

किरण सांमत यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाचे दौरे करण्यास सुरूवात केली होती. कामे केली होती. दरम्यान रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपचा उमेदवार राहीलं. पक्षाने उमेदवारी दिली तर मी निवडणूक लढवेन. इतर कोणी लुडबूड करु नये असे भाजप नेते नारायण राणे यांनी म्हटले होते. अशातच शिंदे गट येथून माघार घेणार का? अशी चर्चा सुरु असतानाच किरण सामंत यांची पोस्ट समोर आली होती. त्यानंतर काही वेळात त्यांनी केलेली ही पोस्ट फेसबुकवरुन डिलीट करण्यात आली.

Kiran Samant Sindhudurg Lok Sabha
मतदान अचूक झाल्याची ‘व्हीव्हीपॅट’मधून होईल खात्री! विनाकारणाचा संशय येईल अंगलट; ‘त्या’ मतदारांसाठी चाचणी मतदानाचाही पर्याय

काय केली होती पोस्ट

मा. नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान होण्याकरिता व अब कि ४०० पार होण्याकरिता रत्नागिरी - सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघातून किरण सामंत यांची माघार - किरण सामंत.

किरण सामंत यांच्या या पोस्टचे स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. पण नंतर किरण सामंत यांच्या अकाऊंटवर ही पोस्ट दिसेनासी झाली. काल रात्री उशिरा सोशल मिडीयाच्या माध्यमातून माघार घेत असल्याची घोषणा केली.त्यामुळे आता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील शिवसेना आणि भाजप यामधील वाद मिटले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Kiran Samant Sindhudurg Lok Sabha
Maharashtra Revenue : महाराष्ट्र सर्वाधिक महसूल देणारे राज्य ; दस्तनोंदणीतून ५० हजार कोटींचे उत्पन्न; २७ लाखांहून अधिक व्यवहार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर मोठी राजकीय घडामोड दिसून येत आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी नारायण राणे यांचा मार्ग मोकळा झाल्याच्या चर्चा आहेत. नारायण राणे आज सिंधुदुर्गमधून प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.