Vishwajeet Kadam : सत्तेसाठी पिसाळलेल्या भाजपला काँग्रेस रोखणार; विश्‍वजित कदम यांचा थेट इशारा

'लोकसभेत सत्ताधाऱ्यांनी मणिपूरवर चर्चा टाळली'
Congress MLA Vishwajeet Kadam
Congress MLA Vishwajeet Kadamesakal
Updated on
Summary

लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या परिस्थितीत चांगली सुधारणा झाली आहे. जिल्ह्यात १९९९ ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

सांगली : केंद्रात भाजप (BJP) सत्तेवर आल्यापासून गेल्या नऊ वर्षांत कर्नाटक, गोव्यासह सात राज्यांतील सत्ताधारी सरकारमधील आमदार फोडून सत्ता मिळवली. भाजप सत्तेसाठी पिसाळल्यासारखे धोरण राबवत आहे, असा आरोप डॉ. विश्‍वजित कदम यांनी केला.

भविष्यात काँग्रेस (Congress) भाजपला रोखेल. पक्षाला येणाऱ्या काळात चांगले दिवस येतील, असे मत आमदार डॉ. विश्‍वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. सांगली लोकसभा मतदार संघातील विधानसभानिहाय आढावा बैठक झाली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

Congress MLA Vishwajeet Kadam
Chitra Wagh : भाजप सरकार आलं म्हणून महिलांवर अत्याचार वाढलेत, असं म्हणायचं का? चित्रा वाघ यांचा थेट सवाल

डॉ. कदम म्हणाले, ‘‘गेल्या काही दिवसांत लोकसभा, विधान मंडळाच्या अधिवेशनात काँग्रेस सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नांवर सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. राज्यातील अतिवृष्टी, शेतकऱ्यांना मदतीसह जतच्या पाणीप्रश्‍नासह जिल्ह्यातील विविध प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील महिलांवरील अत्याचार, वारकऱ्यांवर पोलिसांचा लाठीहल्ल्यासह मणिपूरमधील दुर्दैवी घटनेचा निषेध केला.

Congress MLA Vishwajeet Kadam
हृदय पिळवटून टाकणारी घटना! आजी, आजोबासह नातीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; घरात एकमेकांना चिकटून पडले होते मृतदेह

लोकसभेत यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अविश्‍वास आणून त्यांना या प्रश्‍नी बोलणे भाग पाडले. काँग्रेस आक्रमकपणे आपली भूमिका पार पाडत आहे. काँग्रेस व ‘इंडिया’ आघाडी देशभर आवाज उठवत आहे. लोकसभेत सत्ताधाऱ्यांनी मणिपूरवर चर्चा टाळली. स्थानिक सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. हुकुमशाही विरोधात लढतो आहे.’’

ते म्हणाले, विधानसभेच्या पुरवणी मागण्यांमध्ये ६० हजार कोटींचा निधी सत्ताधारी मंडळीना दिला. असे यापूर्वी कधीही झालेले नव्हते. विरोधकांना तुटपुंजी निधी मिळाला आहे. विरोधकांच्या मतदार संघातील विकासासाठी निधी मिळवणे हा हक्कच आहे. मात्र त्याला सत्ताधाऱ्यांनी हरताळ फासला आहे.

Congress MLA Vishwajeet Kadam
Prithviraj Chavan : नवाब मलिकांवर दबाव, जामिनामागं मोठं राजकारण; माजी मुख्यमंत्र्यांच्या मनात वेगळाच संशय

लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या परिस्थितीत चांगली सुधारणा झाली आहे. जिल्ह्यात १९९९ ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. त्यावेळी ९ पैकी ७ आमदार काँग्रेसचे होते. सर्वांना विश्‍वासात घेऊनच सर्व निवडणुकांना सामोरे जाऊ, असंही कदम यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.