तिघांविरुद्ध अवमान याचिका ; होर्डिंग्ज हटविल्याने उपठेकेदार न्यायालयात

उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात ही अवमान याचिका दाखल झाली आहे.
court
courtsakal
Updated on

बेळगाव : बदली होऊन गेलेले महापालिकेचे आयुक्त के. एच. जगदीश, महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर व निवृत्त महसूल निरीक्षक सीआयबी पाटील यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल झाली आहे. बेळगाव लोकसभा निवडणुकीच्या आधी महापालिकेने शहरातील तीन मोठे होर्डिंग्ज हटविले होते, त्याप्रकरणी ही अवमान याचिका दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.

याप्रकरणी आता महापालिकेला आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात ही अवमान याचिका दाखल झाली आहे. बेळगाव शहरात जाहिरात करवसुली करणाऱ्या एका कंपनीने ही याचिका दाखल केली आहे. शहरातील १८० होर्डिंग्जवरील जाहिरात करवसुलीचा ठेका देण्यासाठी महापालिकेने ई-लिलाव प्रक्रियेचे आयोजन केले आहे, पण त्या लिलाव प्रक्रियेच्या आधी जाहिरात करवसुली करणाऱ्या कंपनीनेच महापालिकेला न्यायालयात खेचले आहे.

जाहिरात करवसुलीचा ठेका घेतलेल्या बेळगावातील एका कंपनीने या कामासाठी उपठेकेदार नियुक्त केला आहे. करवसुलीच्या मुद्द्यावरून उपठेकेदार व महापालिका यांच्यात वाद झाल्यामुळे ते प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने संबंधित उपठेकेदाराला जाहिरात करवसुलीच्या कामापासून रोखता येणार नाही, असा आदेश बजावला. त्यामुळे त्या उपठेकेदाराचे शहरातील जाहिरात करवसुलीचे काम सुरूच राहिले, पण एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या काळात महापालिकेने शहरातील काही होर्डिंग्ज हटविले. त्यात या उपठेकेदाराशी संबंधित तीन होर्डिंग्जचा समावेश होता.

न्यायालयाचा आदेश असूनही महापालिकेने होर्डिंग्ज हटविले व जाहिरात करवसुलीच्या कामापासून रोखले, अशी तक्रार करून त्याने अवमान याचिका दाखल केली. त्यात तत्कालीन महापालिका आयुक्त के. एच. जगदीश, महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर व ज्या विभागातील होर्डिंग्ज हटविले, तेथील महसूल निरीक्षक सीआयबी पाटील यांना प्रतिवादी केले. यापैकी जगदीश हे सध्या महापालिका आयुक्त नाहीत. ते रजेवर गेले ते परत आलेच नाहीत. आणखी एक प्रतिवादी सीआयबी पाटील हे ३१ ऑगस्ट रोजी निवृत्त झाले आहेत. महसूल आयुक्त एस. बी. दोड्डगौडर हे एकमेव प्रतिवादी सध्या महापालिकेत सेवेत आहेत.

म्हणणे मांडावे लागेल

तिन्ही प्रतिवादींना म्हणणे मांडावे लागणार आहे. त्यासाठी मंगळवारी महापालिकेच्या महसूल विभागात एक बैठक झाली. त्या बैठकीला महसूल उपायुक्त दोड्डगौडर व निवृत्त महसूल निरीक्षक पाटील उपस्थित होते. या दाव्याशी संबंधित सर्व माहिती व कागदपत्रे त्यांनी एकत्रित केली. जगदीश हे सध्या बंगळूर येथे असल्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, पण त्यांनाही या सुनावणीवेळी हजर राहून मत मांडावे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()