Sangli : हरिपूर रोडवरील भगवा ध्वज काढल्यावरून तणाव; भाजप नेत्याच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाने ध्वज केला परत

Saffron Flag Controversy : सांगलीतील हरिपूर रोडवरील लोखंडी पुलावर २०१६ पासून पुलाच्या मध्यवर्ती भगवा ध्वज लावला होता.
Saffron Flag Controversy
Saffron Flag Controversyesakal
Updated on
Summary

सहा महिन्यांपूर्वी एक नागरिक याला धडकून जखमी झाला होता. त्यामुळे ध्वज काढण्यात आला होता.

सांगली : हरिपूर रोडवरील (Haripur Road) लोखंडी पुलावर बसवलेला भगवा ध्वज (Saffron Flag) पोलिस व महापालिकेने काढल्यामुळे संतप्त शिवभक्तांनी ‘रास्ता रोको’ केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. भाजप नेत्या ॲड. स्वाती शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पोलिस प्रशासनाने (Sangli Police) भगवा ध्वज परत त्यांच्या ताब्यात दिला.

सांगलीतील हरिपूर रोडवरील लोखंडी पुलावर २०१६ पासून पुलाच्या मध्यवर्ती भगवा ध्वज लावला होता. सन २०१९ आणि २०२१ मध्ये आलेल्या महापुरावेळी बचव पथकाच्या होड्यांना दिशा कळण्यासाठी या ध्वजाचा खूप उपयोग झाला. सहा महिन्यांपूर्वी एक नागरिक याला धडकून जखमी झाला होता. त्यामुळे ध्वज काढण्यात आला होता.

Saffron Flag Controversy
Highway Accident : पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातात पती-पत्नी जागीच ठार; लक्झरीनं दोघांना उडवलं..

याबाबत शिवगर्जना मंडळातील शिवभक्तांनी व परिसरातील नागरिकांनी याबाबत रीतसर परवानगीसाठी महापालिकेमध्ये फाईल सादर केली आहे. महापुराच्या परिस्थितीत पाणी वाढले तर त्या परिसरातील नागरिकांना या ध्वजाचा उपयोग होईल, या उद्देशाने शिवभक्तांनी हा ध्वज त्या ठिकाणी बसवला. परंतु आज दुपारी अचानक पोलिस व महापालिका अतिक्रमण विभागाने हा ध्वज काढल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली.

यावेळी नागरिकांनी घोषणा देत ‘रास्ता रोको’ केला. त्यामुळे वाहतूक खोळंबली. वातावरण तणावपूर्ण झाले. त्याठिकाणी पोलिसही दाखल झाले. ॲड. स्वाती शिंदे यांनी पालकमंत्री सुरेश खाडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, आयुक्त शुभम गुप्ता यांच्याशी वारंवार संपर्क साधून याबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला. मात्र महापालिका प्रशासन, पोलिस प्रशासन हा ध्वज परत देण्यासाठी नकार देत होते.

Saffron Flag Controversy
Murder Case : महामार्गावर फिल्मी स्टाईल पाठलाग अन्.. एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून करणारा आरोपी 'असा' अडकला सापळ्यात

परंतु, सर्व शिवभक्तांच्या रेट्यामुळे आणि ॲड. स्वाती शिंदे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांना हा ध्वज परत द्यायला लागला. वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी हा ध्वज ॲड. स्वाती शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी युवराज बावडेकर, उर्मिला बेलवलकर, अभिमन्यू भोसले, दिगंबर साळुंखे, अवधूत जाधव, प्रदीप निकम, गजानन मोरे यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.