शहरातील निर्बंधाबाबत महापालिका आयुक्‍त म्हणाले..!

शासनाकडून निर्बंध शिथिलतेचा आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कार्यवाही केली जाईल
शहरातील निर्बंधाबाबत महापालिका आयुक्‍त म्हणाले..!
Updated on

सोलापूर : सोलापूर शहरातील रुग्णांचा पॉझिटिव्ही रेट (corona positivity rate) कमी असून कोरोनाचा (covid -19) प्रादुर्भावही कमी झाला आहे. निर्बंध शिथिलतेचा प्रस्ताव राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवला आहे. परंतु त्यांच्याकडून अजून काहीच उत्तर आलेले नाही. त्यामुळे शहरातील निर्बंध 'जैसे थे'च राहणार आहेत. (lockdown) शासनाकडून निर्बंध शिथिलतेचा आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असेही महापालिका पी. शिवशंकर (P. Shivshankar) यांनी 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.

कोरोनाची दुसरी लाट आटोक्‍यात येत असताना डेल्टा प्लस (delta plus) या नव्या व्हेरिएंटमुळे राज्य सरकारने निर्बंध पुन्हा कडक केले. त्यानुसार रुग्णवाढ असलेल्या जिल्ह्यांमधील (solapur district) दुकाने सकाळी सात ते दुपारी चारपर्यंतच उघडली ठेवण्यास परवानगी मिळाली. शनिवार, रविवारी अत्यावश्‍यक वगळता अन्य सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेवली जात आहेत. परंतु, संसर्ग आटोक्‍यात आला असतानाही आणि आरोग्य विभागाने सर्वोतोपरी तयारी केलेली असतानाही निर्बंध का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. तरीही, शासनाकडून आदेश प्राप्त झाल्याशिवाय शहरातील निर्बंध शिथिल होणार नाहीत, असे महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी स्पष्ट केले आहे.

शहरातील निर्बंधाबाबत महापालिका आयुक्‍त म्हणाले..!
पुणे सोमवारपासून अनलॉक; महापौरांची माहिती

ग्रामीण भागातील रुग्णवाढ मोठी असून दररोज साडेपाचशेच्या सरासरीने रुग्ण वाढत आहेत. मागील काही दिवसांत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. माळशिरस, पंढरपूर, माढा, करमाळा व सांगोला या तालुक्‍यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. उर्वरित तालुक्‍यांपैकी अक्‍कलकोट, उत्तर व दक्षिण सोलापुरातील कोरोना आटोक्‍यात आला आहे. ग्रामीणमधील रुग्णवाढ मोठी असल्याने शहराच्या बाबतीतही प्रशासनाकडून सावध पवित्रा घेतला जात आहे. मात्र, या निर्बंधांमुळे विविध घटकांसमोरील अडचणीत वाढ झाली असून अनेक शाळा बंद झाल्या असून काही शाळा विकायला काढल्याचीही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आज रात्री आठ वाजता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे निर्बंध शिथिलतेबाबत काय निर्णय घेतात, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

शहरातील निर्बंधाबाबत महापालिका आयुक्‍त म्हणाले..!
दानशुर कंपन्यांकडून मुंबई महापालिकेला साडे चार लाख लसींचे डोस

1 जुलैपासून शहरात केवळ 445 रुग्ण

सोलापूर शहरातील रुग्णांची संख्या आता 29 हजार 18 झाली असून त्यापैकी एक हजार 436 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या शहरातील 78 रुग्ण उपचार घेत असून आज 20 रुग्णांची वाढ झाली आहे. तत्पूर्वी, 1 जुलै ते 8 ऑगस्ट या काळात शहरात 445 रुग्ण वाढले असून मागील आठ दिवसांत शहरात केवळ 76 रुग्णांची भर पडली आहे. ऑक्‍सिजन बेड्‌सची संख्या पुरेशा प्रमाणात असून बरेच बेड्‌स आता शिल्लक असून तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने महापालिकेने तयारी पूर्ण केली आहे. तरीही, शहरातील निर्बंध शिथिल होत नसल्याने व्यापारी, व्यावसायिक, शाळांचे संस्थाचालक, खासगी कोचिंग क्‍लासचालक, स्कूलबस चालक, भाजीपाला, फळविक्रेते वैतागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता शासनाकडून निर्बंध शिथिलते संदर्भात काय निर्णय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()