साताऱ्यात कोरोनाचा पहिला संशयित

साताऱ्यात कोरोनाचा पहिला संशयित
Updated on

सातारा : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा पहिला संशयित रुग्ण आढळून आला आहे. त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेऊन तपासणीसाठी रासायनिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आता अधिक सतर्कता बाळण्याची गरज आहे.
 
संपूर्ण जगभरात कोरोनाच्या विषाणूंनी थैमान घातले आहे. पुणे व मुंबईसह राज्याच्या विविध भागातील सुमारे 36 रुग्ण आढळले आहेत. साताऱ्याच्या जवळ असलेल्या पुण्यामध्ये सुमारे दहा रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. जिल्ह्यामध्ये परदेशातून आलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवले जात आहे. अशा दहा जणांना त्यांच्या घरामध्येच 14 दिवसांसाठी थांबण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. परंतु, त्यापैकी कोणालाही कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळलेली नव्हती.
 
आज मात्र, परदेशातून आलेल्या व्यक्तीला त्रास होऊ लागला. त्यामुळे दुपारी तो जिल्हा रुग्णलयात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली. त्याला छातीत दुखत होते, तसेच घशातही दुखत होते. त्याचबरोबर श्‍वास घ्यायला त्याला त्रास होत असून खोकलाही आहे. ही लक्षणे कोरोनासदृश वाटल्याने जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला उपचारासाठी तातडीने विलगीकरण कक्षामध्ये दाखल केले. त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले आहेत. तपासणीसाठी ते रासायनिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. संबंधित रुग्ण हा 30 वर्षांचा आहे. तो एक महिना अबुधाबी येथे गेला होता. गुरुवारी (ता. 12) तो विमानाने मुंबई येथे आला. त्यानंतर शुक्रवारी (ता. 13) तो त्याच्या गावी आला. आज त्याला त्रास होऊ लागला. त्यामुळे तो उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला.
 
जिल्ह्यामध्ये कोरोनाचा हा पहिलाच संशयित आढळून आला आहे. अद्याप त्याची तपासणी पॉझिटिव्ह आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही. परंतु, कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी प्रशासनाकडून सांगण्यात येत असलेल्या उपाययोजना व दक्षता घेणे आवश्‍यक आहे. 

आरोग्य विभागाकडून चौकशी
 
कोरोना संशयित रुग्ण दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. या विभागाने संबंधित रुग्ण भारतात आल्यापासून कोठे-कोठे गेला, गावी कोणा-कोणाला भेटला, याबाबतची माहिती घेतली आहे. त्यानुसार संबंधित ठिकाणी लक्ष ठेवले जाणार आहे. रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर, त्या-त्या ठिकाणचा सर्व्हे केला जाणार आहे. 

जिल्हाभरात "करोना' इफेक्‍ट... 

सभा, मेळावे, कार्यक्रम, यात्रा, उरूस, क्रीडा स्पर्धांना बंदी 
गर्दीचे कार्यक्रम घेणारांवर कारवाई होणार 
अंगापुरातील उद्यापासून होणारी वार्षिक यात्रा रद्द 
शाळा, महाविद्यालयांत उद्या हात धुण्याचे प्रात्यक्षिक 
रविवार असूनही बाजारपेठा, बस स्थानक परिसरात शुकशुकाट 
पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द 
महाबळेश्‍वर, पाचगणीत पर्यटकांची गर्दी रोडावली 

राज्यातील शहरालगतच्या शाळा महाविद्यालयांनाही सुटी

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. त्यांनी संबंधीत रुग्ण भारतात आल्यापासून कोठे-कोठे गेला, गावी कोणा-कोणाला भेटला याची माहिती घेतली आहे. त्यानुसार संबंधीत ठिकाणी लक्ष ठेवले जाणार आहे. रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझीटीव्ही आला तर, त्या-त्या ठिकाणचा सर्व्हे केला जाणार आहे. जिल्ह्यामध्ये हा पहिलाच संशयीत आढळून आला आहे. अद्याप त्याची तपासणी पॉझीटीव्ह आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही. परंतु, कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी प्रशासनाकडून सांगण्यात येत असलेल्या उपाययोजना व दक्षता घेणे आवश्‍यक आहे.

ब्रेकिंग : यात्रा समितीवर राज्यात पहिला गुन्हा दाखल

सातारा : सातारा जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 लागू झाल्याचे अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी एका आदेशान्वये घोषित केले आहे. या आदेशानुसार पूर्वतयारीसाठी व प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी Incident Commander  म्हणून डॉ. अमोद गडकरी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, सातारा (मो.क्र.9422471912, ईमेल- cssatara@rediffmail.com) व डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा (मो.क्र.9421233250,  ईमेल-dhozpsatara@gmail.com) यांना सनियंत्रक म्हणून घोषित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कळविले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने  नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी राज्यात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रिडा विषयक कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यत परवानगी देण्यात येऊ नये. यापूर्वी परवानगी देण्यात आली असल्यास ती रद्द करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा अपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हे  प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत.  आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत करोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरुन देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र  प्रवास करीत असल्याने संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसार्गात अधिक वाढ होवू यासाठी त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. सातारा जिल्ह्यात आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये यासाठी पूर्वतयारी करणे अगत्याचे झाले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मोठया प्रमाणात लोकांचा समूह एकत्र जमू न देण्यासाठी  संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये घेण्यात येणाऱ्या सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, यात्रा, ऊरुस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिडा स्पर्धा इत्यादीवर दि. 15 मार्च 2020 ते पुढील आदेश होईपर्यंत बंदी लागू करण्यात येत आहे. यापूर्वी परवानगी देण्यात आलेली असल्यास सदर परवानग्या रद्द करण्यात येत आहेत.

यात्रा, ऊरुस, धार्मिक सामाजिक कार्यक्रमात पूजारी किंवा धर्मगुरु इत्यादींना विधिवत पूजा करण्यास किंवा परंपरेने करावयाचे कार्यक्रम कमीत कमी मोजक्या लोकांच्या उपस्थित करण्यास व खासगी कार्यक्रम फक्त कौटुंबिक स्वरुपात करण्यास बंदी असणार नाही. परंतू या दोन्हीबाबतीत सर्व वैद्यकीय आरोग्यविषयक सुरक्षा पाळणे बंधनकारक राहील. सर्व शासकीय यंत्रणांनीही अशाप्रकारे सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, ऊरुस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिडास्पर्धा, इत्यांदींच्या आयोजनासंदर्भात कोणतीही परवानगी त्यांच्या स्तरावर देण्यात येऊ नये.

 सातारा जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांना तथा दंडाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात होणाऱ्या अशा कार्यक्रमांना प्रतिबंध करण्यासाठी व फक्त विधिवत पूजा किंवा कौटुंबिक कार्यक्रमांना परवानगी देण्यासाठी प्राधिकृत करुन तसे अधिकार तात्पुरत्या स्वरुपात प्रदान करण्यात येत आहेत. तथापि सदरची परवानगी देताना पोलिस व आरोग्य विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र  घेणे अवश्यक आहे.

या आदेशाचे उल्‌लंघन करुन गर्दीचे कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधित व्यक्ती/संयोजकांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 अन्वये कारवाई करण्यात येईल यासाठी सर्व तहसिलदार यांना प्राधिकृत करण्यात आल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.