खबऱ्यामुळे सापडला विकृत आरोपी

Corrupt accused found
Corrupt accused found
Updated on

नगर : लहानपणापासूनच तो उचलेगिरीत माहिर होता. अल्पवयात केलेले काही गुन्हे पचले. त्यामुळे त्याचे धाडस वाढत गेले आणि मनातील विकृतीही. काहीही केलं तरी काहीच होत नाही, अशी त्याची मानसिकता बनली. त्यातूनच त्याने कोपरगावातील एका शाळकरी मुलीवर अत्याचार केला आणि पळून गेला. पोलिसांची त्याने झोप उडवली. रानोमाळ भटकत राहिला. पन्नास पोलिसांचे पथक त्याला शोधत होते, तरीही तो गुंगारा देत होता. शेवटी सिन्नर तालुक्‍यातील उसाच्या शेतात पोलिसांनी त्याच्या मुसक्‍या आवळल्या. अमोल अशोक निमसे (वय 19, रा. शिरापूर, ता. पाथर्डी), असे या आरोपीचे नाव. 

कोळपेवाडी जिल्हा परिषद शाळेतील चौथीतील मुलीवर अमोलने अत्याचार केल्याने त्याच्यातील विकृती पुन्हा समोर आली. शाळकरी मुलगी गेटजवळ वडिलांची वाट पाहत उभी होती. त्या वेळी आरोपी निमसे तेथे दुचाकीवर आला. "तुझ्या वडिलांजवळ सोडतो,' असे म्हणून त्याने तिला दुचाकीवर बसविले. पुढच्या चौकात तिचे वडील नव्हते. त्या वेळी, "घरी सोडतो' असे सांगून त्याने तिला मळ्यात नेले. तेथे शेतमजूर असल्याने शेजारील डाळिंबबागेत घेऊन गेला. अंधार होईपर्यंत तो तिला घेऊन तेथे बसला. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. 

अंधार पडल्यानंतर रात्रभर शेतावरील खोलीत तिच्यासह राहिला. तेथेही त्याने तिच्यावर अत्याचार केला. सकाळी उठल्यानंतर तो तिला घेऊन रस्त्याला आला. तेथे त्याला एक मित्र भेटला. "तुला पोलिस शोधत आहेत,' असे त्याने सांगितल्यामुळे पीडितेला एका मोटरसायकलवर बसवून दिले. तो तेथून पांचाळे (ता. सिन्नर) गावी पळून गेला. 
तेथे एका बंधाऱ्यावर त्याने अंघोळ केली, कपडे फेकून दिले आणि दुसरा शर्ट घालून उसात लपला. 

दुसऱ्या दिवशी तो रस्त्यावर आला आणि ट्रकमध्ये बसला. ट्रकचालकाला त्याच्याबाबत शंका आली. त्याने एकाला फोन केला आणि ट्रकची गती कमी केली. त्या वेळी आरोपी ट्रकमधून उडी टाकून पळाला. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस व कोपरगाव तालुका पोलिस त्याचा शोध घेत होतेच. वडांगळी (ता. सिन्नर) येथील उसाच्या शेतात आरोपी लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. 

शोधासाठी ड्रोनचा वापर 
आरोपीकडे फोन अथवा पैसे नसल्याने तो परिसरातच फिरणार, अशी खात्री होती. चार दिवस सिन्नर, वावी, पांचाळे, वडांगळी, देवपूर निमगाव, निमगाव कोऱ्हाळे, देर्डे कोऱ्हाळे गावकऱ्यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला. शेवटी दोनशे एकरांच्या काटवनात ड्रोनद्वारे शोध घेतला, तरीही तो सापडला नाही. शेवटी खबऱ्यानेच त्याचा माग काढला. या माहितीबद्दल त्याला बक्षीस देण्यात आले. 

आरोपी विकृत प्रवृत्तीचा 
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तीन पथकांतील 24 कर्मचारी आणि कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस, अशी चार पथके आरोपीचा शोध घेत होते. आरोपी विकृत प्रवृत्तीचा असून, निर्ढावलेला आहे. अटकेतनंतरही त्याचा चेहरा भावशून्य होता. 
- संदीप पाटील, सहायक पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.