'तिला' शिवाजी स्टेडियममागील झोपडपट्टीत नेणाऱ्यास 15 वर्षाची शिक्षा

'तिला' शिवाजी स्टेडियममागील झोपडपट्टीत नेणाऱ्यास 15 वर्षाची शिक्षा
Updated on

कऱ्हाड ः अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयीतास 15 वर्षाची कैद व एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश औटी यांनी नुकतीच ठोठावली. गुन्ह्यात संशयीताला साथ साथ देणाऱ्या महिलेसही एका वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. सैफान उर्फ सागर मारुती पात्रे व लक्ष्मी गिरीश पुजारी (दोघेही रा. शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
 
घरातील वादामुळे उत्तर प्रदेश येथील एका अल्पवयीन मुलीला रेल्वेने पुणे येथे आली होती. तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन संशयीता सागरने तिला डांबून ठेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर काही दिवसांनी पुण्यातील खोली सोडून संशयीत त्या मुलीला घेऊन शिवाजी स्टेडियम पाठीमागील झोपडपट्टीत घेऊन आला. तेथेही तिच्यावर अत्याचार केले. एकाने मुलीवर होणाऱ्या अत्याचारांबाबत पोलिसांना कळवले. त्यामुळे 13 मार्च 2013 रोजी पोलिसांनी सागरसह त्याला मदत करणाऱ्या लक्ष्मी पुजारी महिलेस अटक केली. खटल्याची सुनावणी सुरू झाली. त्यावेळी पीडित अल्पवयीन मुलगी, तिच्या आई-वडिलांचे व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे साक्षीदारांचे जबाब नोंदवले.

सरकारी पक्षातर्फे 11 साक्षीदार तपासण्यास आले. भक्कम पुरावा मिळाल्याने न्यायालयाने दोन्ही संशयीतांना दोषी धरत शिक्षा ठोठावली. त्यात मुख्य संशयीत सागरला 15 वर्षाची शिक्षा, तर एक हजार रुपयाचा दंड, दंड न भरल्यास एका महिन्याची साधी कैद, तर सहआरोपी महिलेस एका वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली.

हेही वाचा : मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी बातमी 

वाचा : हारतुरे न स्वीकारता पाण्यासाठी लढणारा सच्चा शिवसैनिक

विवाहितेच्या छळप्रकरणी पाच जणांवर गुन्हा 

सातारा : दुकानाकरिता दोन लाख रुपयांची मागणी करत विवाहितेचा मानसिक छळ केल्याप्रकरणी साताऱ्यातील पाच जणांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राहुलसिंग धनंजयसिंग परदेशी (वय 34), बिना धनंजयसिंग परदेशी (वय 58), केतन परदेशी सर्व (रा. 53, गणेश पेठ, पुणे) आणि वनमाला सुरेंद्र कौशिक (रा. नगर) जयश्री नितीन डाळवाले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनुराधा राहुलसिंग परदेशी (वय 30, मूळ रा. 53 गणेश पेठ, पुणे सध्या रा. दिव्यानगरी, सातारा) या विवाहितेचा एक जानेवारी 2016 ते 10 मार्च 2020 पर्यंत मानसिक, शारीरिक छळ केला. माहेरून दुकानाकरिता दोन लाखांची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केल्याचे तक्रार दिली. याप्रकरणी राहुलसिंग परदेशी, बिना परदेशी, केतन परदेशी आणि वनमाला सुरेंद्र कौशिक, जयश्री डाळवाले यांच्याविरोधात विवाहितेचा जाचहाट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा : ब्रेकिंग : यात्रा समितीवर राज्यात पहिला गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.