मुलासह आईवडिलांना कोरोनाने गाठलं; 13 तासांत तिघांचा मृत्यू

इंजिनिअर असणारा मुलगा पंधरा दिवसांपूर्वी गावी आला
मुलासह आईवडिलांना कोरोनाने गाठलं; 13 तासांत तिघांचा मृत्यू
Updated on

शिरशी : शिराळा तालुक्यातील (shirala tehsil) झिमुर कुटुंबीयांवर कोरोनाने (covid-19) घाला घातला. एकाच आठवड्यात आई, वडील, मुलगा व पुतण्या असा चौघांचा मृत्यू झाल्याने शिरशी गावात शोककळा पसरली आहे. शिराळा हा डोंगरी, दुर्गम अति पावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील बहुतांशी लोक हे नोकरीनिमित्त मुंबईला (mumbai) असतात. तसेच शिराळा उत्तर भागातल्या शिरशी गावातील झिमुर कुटुंब हे उदरनिर्वाहासाठी मुंबईला होते. ज्यांचा मृत्यू झाला ते वडील मिल कामगार होते. सेवानिवृत्त झाल्याने आपल्या पत्नीसह १५ वर्षांपूर्वी गावी येऊन शेती करू लागले. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. मुली विवाहित आहेत. मुलगा मुंबईत सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. त्याचे एक वर्षा पूर्वी लग्न झाले. (covid-19 dead three members one family in shirala sangli)

इंजिनिअर असणारा मुलगा पंधरा दिवसांपूर्वी गावी आला. त्यावेळी आई आजारी असल्याने गावीच थांबला. आईला कोरोनाची लागण झाली. तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान त्याच्या वडिलांना कोरोणाची लागण झाली. त्या दोघांवर उपचार सुरू झाले. आई वडिलांच्या तब्बेतीत सुधारणा झाली. मात्र पुन्हा वडिलांची (father) तब्बेत खालावली. दरम्यात मुलालाही कोरोनची लागण झाली. त्याच्यानंतर वडिलांचे निधन झाले. त्यावेळी आई आणि मुलगा व्हेंटिलेटरवर (ventilator) होते. सोमवारी (१७) सकाळी ५ वाजता पहाटे वडिलांचे निधन झाले.

मुलासह आईवडिलांना कोरोनाने गाठलं; 13 तासांत तिघांचा मृत्यू
'कोकणला देण्याच्या वेळी सेनेचा हात आखडता'

सकाळी झिमुर कुटुंबीयांनी त्यांचे अंत्यसंस्कार आटोपले. त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता आईचे निधन झाले. हा झिमुर कुटुंबीयांवर १२ तासात दुसरा आघात होता. ते दुःख समोर उभे असतानाच आईच्या निधनानंतर अवघ्या एका तासात मुलाचा मृत्यू झाला. झिमुर कुटुंब दुःखात बुडाले. एकाच दिवशी हा आघात झाल्याने शिरशी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. आठ दिवसांपूर्वी याच मुलाच्या चुलत भावाचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे आठ दिवसांत झिमुर कुटुंबातील चार जणांचा कोरोनाने बळी घेतला.

१३ तासात कुटुंब उध्वस्त मात्र तिचे नशीब बलवत्तर

सकाळी ५ वाजता वडील, सायंकाळी पाच वाजता आई त्यानंतर सहा वाजता मुलगा असे तेरा तासात कुटुंब उध्वस्त झाले. त्या मुलाची २१ वर्षीय पत्नीचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याने तिचे नशीब बलवत्तर ठरले. मात्र घरातील तीन सदस्य व आधार गेल्याने तिचे कुटुंब उध्वस्त झाले.

२३ दिवसाचे प्रयत्न निष्फळ

कुटुंबातील सदस्यांनी त्या चौघांना वाचवण्यासाठी सलग तेवीस दिवस रात्रंदिवस प्रयत्न केले. त्यांच्या उपचारासाठी आशा झिमुर २३ दिवस झोपलेल्या नाहीत. आठ दिवसांपूर्वी त्यांचा पुतण्या गेल्याने पहिला धक्का बसला. त्यानंतर काल दीर, जाऊ आणि पुतण्या यांच्या एकाच दिवशी जाण्याने संपूर्ण कुटुंब खचले आहे. त्यामुळे त्यांचे २३ दिवसांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

मुलासह आईवडिलांना कोरोनाने गाठलं; 13 तासांत तिघांचा मृत्यू
'हे' आहेत सूजीपासून बनवले जाणारे स्नॅक्स

"आमच्यावर आलेला प्रसंग कोणावर येऊ नये. कुटुंबातील चार सदस्यांना गमावले आहे. सर्वांनी घरी रहा, सुरक्षित रहा आणि आपल्या सर्वांची काळजी घ्या. आपल्या कुटुंबातील सदस्य गमावल्यावर मनाला यातना होतात त्या सांगता येत नाहीत. त्या आम्ही जवळून अनुभवत आहे. त्यामुळे अशी वेळ कोणावर येऊ नये."

- आशा झिमुर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.