अबब! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मृत्यूची नोंद;'या शहरात' रोज २७ मृत्यू

Harne Taluka Dapoli one more covid patient death total death count is 59 in ratnagiri
Harne Taluka Dapoli one more covid patient death total death count is 59 in ratnagiri
Updated on

बेळगाव: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (covid second wave) सर्वाधिक मृत्यूची नोंद मे महिन्यात झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातून(health department) मिळालेल्या माहितीनुसार मेमध्ये ८३८ जणांची मृत्यूची नोंद आहे. याचा अर्थ शहरात रोज सरासरी २७ जणांचा मृत्यू झाला आहे. (covid-second-wave-recorded-the-highest-number-of-deaths-in-belgaum-covid-19-update-marathi-news)

कर्नाटकात कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारीत सुरू झाली. बेळगावात मार्चपासून कोरोना संसर्ग सुरू झाला. एप्रिल व मे महिन्यात संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. एप्रिलमध्ये बाधितांची संख्या वाढली, पण मृत्यू कमी होते. मेमध्ये संसर्ग व मृत्यूचे प्रमाणही वाढले. बेळगाव शहरात झालेल्या मृत्यूंची नोंद महापालिकेकडे झाली आहे. मे महिन्यात ८३८ जणांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या १४ महिन्यांच्या काळातील बेळगाव महापालिकेकडील एकूण मृत्यू नोंद आता ९ हजार ९४५ इतकी झाली आहे. यापैकी कोरोनामुळे किती जणांचा मृत्यू झाला, याची स्वतंत्र माहिती सध्या महापालिकेकडे उपलब्ध नाही. गतवर्षी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची माहिती महापालिकेकडे पाठविली जात होती; पण यंदा ती माहिती थेट जिल्हा आरोग्य विभागाकडे पाठविली जात आहे. त्यामुळे कोविड व नॉन कोविड अशी वेगळी मृत्यू नोंद सध्या महापालिकेकडे नाही.

गतवर्षी एप्रिलमध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. ३ एप्रिल रोजी बेळगावात ३ बाधित सापडले. त्यानंतर संख्या वाढत गेली. गतवर्षी जूनअखेरपर्यंत कोरोना संसर्ग नियंत्रणात होता. जुलै व ऑगस्टमध्ये संसर्ग वाढला, तर ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले. गतवर्षी ऑगस्टमध्ये महापालिकेकडे तब्बल ११३६, तर सप्टेंबरमध्ये १६७२ मृत्यू नोंद झाली. या दोन महिन्यांत मृत्यू नोंद वाढल्यामुळे कोरोनाने मृत्यू वाढल्याची वस्तुस्थिती आरोग्य विभागानेही मान्य केली, पण प्रत्यक्षात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची सरकारी आकडेवारी मात्र वाढली नाही.

एप्रिलमध्ये ६१३ मृत्यू

कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतरची महापालिकेकडील मृत्यू नोंद पाहिली तर एप्रिल व मे २०२१ मध्ये ही नोंद वाढली आहे. एप्रिलमध्ये ६१३ जणांची नोंद झाली आहे. त्यात मे महिन्यात वाढ होऊन ती ८३८ इतकी झाली आहे. गतवर्षी जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांत कोरोनाबाधितांना उपचारासाठी बेळगावातच दाखल केले जात होते. त्यामुळे कोरोनामुळे बेळगावातील बिम्स किंवा अन्य खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त होती. बेळगाव शहरात मृत्यू झाल्यामुळे त्यांची नोंद महापालिकेकडेच झाली होती. यंदा मात्र प्रत्येक तालुका केंद्रावर कोरोनाबाधितांवर उपचाराची सोय होती. त्यामुळे बेळगावात मृत्यू झालेल्यांची संख्या कमी होती.

मे महिन्यात बेळगाव शहरात जेवढे मृत्यू झाले, त्यांची नोंद महापालिकेकडे झाली आहे. मे महिन्यात ८३८ जणांच्या मृत्यूची नोंद महापालिकेत झाली आहे.

डॉ. संजय डुमगोळ, आरोग्याधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()