गायीच्या दुधास किमान ४० ते ४२ रुपये दर मिळून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीस चालना मिळेल.
किल्लेमच्छिंद्रगड : एक ऑक्टोबरपासून गायीच्या दुधाचा दर (Cow Milk Rate) दोन रुपयांनी कमी झाला आहे. मात्र, संकलन करणाऱ्या महाभागांनी दुधास आकर्षक लाभांश, भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून फॅटमारी करून उत्पादकांना लुटण्याचे काम सुरू केले असल्याचे चित्र आहे.
शासनाने किमान ३४ रुपये दराचे धोरण असताना सरासरी दर २५ रुपये मिळतोय. दुधाचे दर वाढले की पशुखाद्याचे देखील वाढतात. परंतु दुधाचे दर कमी झाल्यावर ते कमी होत नाहीत. या खेळात पशुखाद्याचे दर गत तीन वर्षांत पाचशे रुपयांनी वाढलेत.
पशुखाद्यासाठी २५ टक्के अनुदानाची आणि दुभत्या जनावरांसाठी दोन ते तीन रुपयांत विमा संरक्षण देण्याची शासनाची घोषणा हवेतच विरली. शालेय पोषण आहारात बटर मिल्कचा वापर केल्यास अशाश्वत स्वरुपात असलेला दुग्ध व्यवसाय शाश्वत स्वरूप धारण करेल.
गायीच्या दुधास किमान ४० ते ४२ रुपये दर मिळून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीस चालना मिळेल. दुधासाठी उसाप्रमाणे उत्पादनखर्चावर आधारित एफआरपी हवी. त्यामध्ये किमान १५ टक्के अधिक नफा देऊन दर मिळायला हवा. दर कमी असताना भेसळ करून जादा दराचे, लाभांशाचे आमिष दाखविणाऱ्या दूध संस्था, केंद्राची वेळोवेळी तपासणी व्हायला हवी.
शालेय पोषण आहारात बटर मिल्कचा वापर केल्यास अशाश्वत स्वरुपात असलेला दुग्ध व्यवसाय शाश्वत स्वरूप धारण करेल. गायीच्या दुधास किमान ४० ते ४२ रुपये दर मिळून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीस चालना मिळेल. दुधासाठी उसाप्रमाणे उत्पादनखर्चावर आधारित एफआरपी हवी. त्यामध्ये किमान १५ टक्के अधिक नफा देऊन दर मिळायला हवा. दर कमी असताना भेसळ करून जादा दराचे, लाभांशाचे आमिष दाखविणाऱ्या दूध संस्था, केंद्रांची वेळोवेळी तपासणी व्हायला हवी.
दिवसेंदिवस दूध उत्पादनात होत चाललेली घट भविष्यात हा व्यवसाय मोडकळीस येण्याचा धोका दर्शवितो. अधोगतीकडे चाललेला दूध व्यवसाय वाचविण्यासाठी शासनाने निर्णायक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी संघटना याप्रश्नी का बोलत नाहीत, हाही चिंतनाचा विषय आहे. त्यांनी बोलते व्हायला हवे.
-देवानंद पाटील, सामजिक कार्यकर्ते, येडेमच्छिंद्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.