पराभूत झाल्याच्या रागातून विरोधी गटाकडून विजयी पॅनेलच्या प्रमुखाचा खून

crime cases in hukkeri belgaum opposite party attack on candade and he died in belagavi
crime cases in hukkeri belgaum opposite party attack on candade and he died in belagavi
Updated on

हुक्केरी (बेळगाव) : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी (३०) जाहीर झाला. त्यात सुलतानपूर (ता. हुक्केरी) येथे एका पॅनेलचे १० पैकी १० उमेदवार जिंकले. हे सहन न झाल्याने विरोधी गटाने विजयी पॅनेल प्रमुखाचा खून केल्याचा आरोप होत आहे. शानूरसाब दस्तगीरसाब मुल्ला असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, सुलतानपूर गावातील पंचायत निवडणुकीत दोन गटात चुरस होती. काल (३०) निकाल लागला तेव्हा शानूरसाब मुल्ला पॅनेलमधील १० पैकी १० उमेदवार जिंकले. या पराभवामुळे मानहानी झालेल्या विरोधकांनी बुधवारी रात्री शानूरसाब मुल्ला यांच्या घरावर हल्ला केला. प्राणघातक हल्ला झाल्याने गंभीर जखमी झालेल्या शानूरसाब यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारा दरम्यान गुरुवारी (३१) सकाळी शानूरसाब मुल्ला यांचा मृत्यू झाला. 

याबाबत मयत शानूरसाब मुल्ला यांचा मुलगा मलिकजान मुल्ला यांनी आमचा विजय झालेला सहन न झाल्याने, विरोधी गटाच्या लोकांनी वडिलांना मारहाण करुन त्यांचा खून केला असल्याचा आरोप केला. निवडणुकीची मतमोजणी संपल्यावर घरी आल्यावर मुल्ला यांच्या पॅनेलचे सर्व दहा उमेदवार निवडून आले. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सर्वजण थांबले असताना विरोधी गटाच्या १५ पेक्षा अधिक जणांनी शानूरसाब यांना मारहाण करुन त्यांचा खून केल्याचा आरोप होत आहे. या घटनेबाबत हुक्केरी पोलिस अधिकचा तपास करत आहेत.


हुक्केरी तालुक्यात खळबळ 

ग्रामपंचायत निवडणुकीमुळे वातावरण तापले आहे. अशातच निवडणूक जिंकल्याच्या रागातून घडलेल्या या घटनेने हुक्केरी तालुक्यात खळबळ उडाली असून सुलतानपूर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.