स्वतःच्या शेतात केली गांजाची लागवड; सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

संशियताला अटक, कडेगाव पोलिसांची कारवाई
स्वतःच्या शेतात केली गांजाची लागवड; सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त
Updated on

कडेगाव (सांगली) : हिंगणगाव खुर्द (ता. कडेगाव) येथील संभाजी सदाशिव जाधव (वय 59) याच्या शेतामध्ये 2 लाख 57 हजार 80 रुपये किमतीचा 25 किलो 708 ग्रॅम गांजा मिळून आला. याप्रकरणी संशयित संभाजी जाधव याच्या विरोधात कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, हिंगणगाव खुर्द येथे संशयित संभाजी जाधव याने आपल्या मालकीच्या जमीन गट नं.919 मधील वांग्याचे शेताचे कडेला केळीलगत ठिकठिकाणी बेकायदा, विनापरवाना, मानवी मनावर व मेंदुवर परिणाम करणारे गुंगीकारक घटक असलेल्या गांजाच्या रोपाची लागवड केली असल्याची टीप कडेगाव पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे कडेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पांडुरंग भोपळे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलिस हवालदार संपत जाधव, हरिदास पवार यांच्या पथकाने हिंगणगाव खुर्द येथे आज दुपारी 3.40 वाजण्याच्या सुमारास संभाजी जाधव याच्या शेतात छापा टाकला असता तेथे 5 ते 6 फूट उंचीची गांजाची झाडे दुमडून प्लास्टिकच्या तीन पोत्यांमध्ये ठेवलेली आढळून आली.

त्यामध्ये एकूण 25 किलो 708 ग्रॅम वजनाची गांजाची झाडे असा एकूण 2 लाख 57 हजार 80 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. हा गांजा पोलिस पथकाने जप्त करून संशयित संभाजी जाधव याला अटक केले. याप्रकरणी कडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे यांनी संशयित जाधव याच्या विरोधात कडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर अधिक तपास पोलिस निरीक्षक पांडुरंग भोपळे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.