शून्य टक्के व्याज दराने कर्ज हवे आहे का?

शून्य टक्के व्याज दराने कर्ज हवे आहे का?
Updated on

सोलापूर : बजाज फायनान्समधून बोलत आहे... शून्य टक्के व्याज दराने कर्ज हवे आहे का? असे बोलून कर्ज देण्याचे आमिष दाखवून विविध प्रोसेसच्या नावाखाली सोलापूरच्या व्यापाऱ्याची चार लाख 10 हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी साक्षी सावंत आणि नितीन पाटील या दोघांवर जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

क्लिक करा : 'ती' घाबरलेल्या, गोंधळलेल्या अवस्थेत रस्त्यावर थांबली होती..!

व्यापारी फैजान अ. वाहिद चौधरी (वय 27, रा. साखर पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. फैजान चौधरी यांचा फ्रूट विक्रीचा अडती व्यवसाय आहे. 25 ऑक्‍टोबर रोजी चौधरी यांना साक्षी सावंत या महिलेचा फोन आला. साक्षीने शून्य टक्के व्याज दराने कर्ज हवे आहे का? याची विचारणा केली. या वेळी चौधरी यांनी 15 लाख रुपये कर्जाची गरज असल्याचे सांगितले. दोन दिवसांनी साक्षीने तुम्हाला 13 लाख 68 हजार कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. तसेच कर्ज हवे असल्यास पॉलिसी काढावी लागेल, अशी अट घातली. त्या पॉलिसीसाठी 64 हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले. या वेळी चौधरी यांनी साक्षीने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कागदपत्रे व्हॉट्‌सऍप केली आणि ऑनलाइन पद्धतीने 65 हजार रुपये पाठविले. 

क्लिक करा : #Solapur नवी पेठेत बॅरिकेड लावून नो व्हेईकल झोन 

त्यानंतर बजाज फायनान्सचा मॅनेजर नितीन पाटील बोलतोय, असे सांगून तुम्हाला सिक्‍युरिटी रक्कम म्हणून एक लाख 36 हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. कर्जाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होईल, असे सांगितले. यावर विश्‍वास ठेवून चौधरी यांनी पैसे पाठविले. यानंतर पुन्हा काही दिवसांनी तुमच्या कर्जाला टॅक्‍स बसल्याचे सांगत दोन लाख पाच हजार रुपये टॅक्‍स भरण्यास सांगितले. ही टॅक्‍सची रक्कम कर्जामध्ये रिफंड मिळेल, असे सांगितल्यामुळे यावर विश्‍वास ठेवून चौधरी यांनी ही रक्कम देखील ऑनलाइन भरली. त्यानंतर 18 लाख 21 हजार रुपये चौधरी यांच्या खात्यावर पाठवल्याचा मॅसेज आला. चौधरी यांनी बॅकेत जाऊन चौकशी केली. पैसे जमा झाले नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत चौकशी केल्यानंतर तुमच्या बॅंकेच्या खात्याला गॅरंटर नाही, गॅरंटीसाठी साडेतीन लाख रुपये भरण्यास सांगितले. यानंतर चौधरी यांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.