कऱ्हाड : कुऱ्हाडीने पत्नीचा खून करणाऱ्या पतीस शिक्षा

कऱ्हाड : कुऱ्हाडीने पत्नीचा खून करणाऱ्या पतीस शिक्षा
Updated on

कऱ्हाड ः चारित्र्याच्या संशयावरून मानसिक व शारीरिक छळ करून कुऱ्हाडीने मारहाण करीत पत्नीचा खून करणाऱ्या पतीस एक वर्ष सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांनी सुनावली. जयवंत सावंत (रा. वजरोशी, ता. पाटण) असे शिक्षा झालेल्याचे नाव असल्याची माहिती सहायक सरकारी वकील ऍड. मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.
 
याबाबत अधिक माहिती अशी, जयवंत सावंत याने पत्नी शीला हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन तिचा मानसिक व शारीरिक छळ केला होता. तसेच चिडून जाऊन कुऱ्हाडीने तिच्या मानेवरती गंभीर मारहाण करून तिचा खून केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयात सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांनी जयवंत सावंत याला दीड वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील ऍड. मिलिंद कुलकर्णी यांनी काम पाहिले. त्यांना सरकारी वकील ऍड. आर. सी. शहा, सहायक पोलिस निरीक्षक ए. एल. गोरड, सहायक फौजदार तावरे यांनी सहकार्य केले. 

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा
 

सातारा : विनयभंग करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आठ जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकुंद सीताराम त्र्यंबके, रवींद्र साबळे, सदाशिव दळवी, सुनीलकुमार माने, महामुनी, जितेंद्र जगदाळे, आफिया शेख व तिची आई (रा. कोरेगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
 
एप्रिल 2016 ते 6 जानेवारी 2020 पर्यंत वेळोवेळी कृष्णानगर येथे तसेच महसूल कार्यालयातील अधिकारी मुकुंद त्र्यंबके, रवींद्र साबळे, सदाशिव दळवी, सुनीलकुमार माने, उपकार्यकारी अभियंता कोरेगावचे महामुनी व एचआर, कोरेगाव जितेंद्र जगदाळे यांनी संगनमत करून वारंवार लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच आफिया शेख व तिची आई यांनी सरकारी कामात अडथळा आणून ऑफिसमध्येच मारहाण व शिवीगाळ केल्याचे संबंधित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून आठ जणांवर विनयभंग करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप बधे तपास करत आहेत. 

विवाहितेच्या छळप्रकरणी गुन्हा दाखल 

सातारा : चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तिघांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पती सलिम यासिन मुलाणी, सासू सुगराबी यासीन मुलाणी, नणंद नूरजहॉं हसन पठाण (सर्व रा. शहापूर, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत रेश्‍मा सलिम मुलाणी (वय 29, रा. शहापूर, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. घरगुती कारणावरून तसेच त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन सर्व संशयित शारीरिक, मानसिक त्रास देत होते. तसेच मारहाण करून शिवीगाळ करत होते. शनिवारी (ता. 22) रात्री आठच्या सुमारास पतीने उजव्या खांद्यावर व पायावर सुरीने वार करून जखमी केले, असे रेश्‍मा यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 

महसूल बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल 

सातारा : कृष्णा नदीच्या पात्रातून वाळूची चोरी करून शासनाचा महसूल बुडवल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मंगेश भिकू नवघणे (वय 31, रा. वासोळे, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (ता. 21) पहाटे एक ते सकाळी आठच्या दरम्यान क्षेत्रमाहुली (ता. सातारा) येथील कृष्णा नदीच्या पात्रातून अनोळखी व्यक्तीने वाळूचे अवैध उत्खनन करून चोवीस हजार रुपये किमतीची सहा ब्रास वाळू चोरून नेल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()