Belgaum News : दक्षिण उपनोंदणी कार्यालयात जागा रिक्त, गर्दीत वाढ; कंत्राटींवर भिस्त

विविध दस्त नोंदणीसाठी वाढती गर्दी; मोजक्या कर्मचाऱ्यांवरच कार्यालयाचा भार.
Belgaum Registrar Office crowd
Belgaum Registrar Office crowdSakal
Updated on

बेळगाव : शहरात एकच उपनोंदणी कार्यालय होते. मात्र, एकाच कार्यालयावर भार पडत असल्याने आणि नागरिकांची कामे वेळेत होत नसल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर बेळगाव दक्षिण उत्पन्न नोंदणी कार्यालय सुरू केले.

तीन वर्षांपासून तिसरे रेल्वे गेटजवळ दक्षिण उपनोंदणी कार्यालय सुरू आहे. येथील कामाची माहिती घेण्यासाठी आज कार्यालयाला भेट दिली.

कार्यालय सुरू होण्यापूर्वीच अनेकांनी कार्यालयाच्या समोर गर्दी केली होती. सकाळी साडेदहा ते दुपारी साडेचारपर्यंत कार्यालय सुरू असते. नोंदणी वेळेत व्हावी, यासाठी अनेकांची धडपड सुरू सुरू होती.

दक्षिण उपनोंदणी कार्यालयाच्या अखत्यारीत सुरुवातीला फक्त बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावे आणि परिसर येत होता. त्यामुळे विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होती.

मात्र, मार्चपासून राज्य सरकारने जिल्ह्यातील नागरिकांना जवळच्या कोणत्याही कार्यालयात विविध नोंदणी करून घेऊ शकतात, अशी माहिती दिली. तिसरे रेल्वे गेटजवळील बेळगाव दक्षिण उपनोंदणी कार्यालयात गर्दी वाढत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

मात्र, वेगवेगळ्या प्रकारची खरेदी-विक्री, विवाह नोंदणी, करार, मृत्युपत्र, घानवट, समेट, करार पत्रक रद्द, यांसह विविध कामांसाठी नागरिक बेळगाव दक्षिण उपनोंदणी कार्यालयात आले होते. त्यांच्याशी संवाद साधला असता ऑनलाईनवर अर्ज केल्यानंतर चलन भरावे लागते.

चलन भरल्यानंतर नोंदणीसाठी कधी यावे? याची वेळ आणि तारीख दिली जाते. कार्यालयात अधिक वेळ थांबून राहावे लागत नाही, अशी माहिती दिली. मात्र, नोंदणी कार्यालयात अनेकदा सर्व्‍हर डाऊनची समस्या निर्माण होते. काम वेळेत होत नसल्याच्या तक्रारी अनेकजण करीत होते.

Belgaum Registrar Office crowd
Belgaum News : राज्य सरकारविरोधात भाजपचे आज आंदोलन - राज्य सचिव एन. रविकुमार

एक दिवस सरकारी कार्यालयात बेळगाव दक्षिण उपनोंदणी कार्यालय

खरेदी-विक्री व वेगवेगळ्या प्रकारची नोंदणी यासह महत्त्वाच्या कामांसाठी उपनोंदणी कार्यालयात नागरिकांची गर्दी असते. मात्र, काही दिवसांपासून तिसरे रेल्वे गेटजवळील दक्षिण विभाग उपनोंदणी कार्यालयातील उपनोंदणी अधिकाऱ्यांची जागा रिक्त आहे.

कार्यालयाचा भार कंत्राटी कामगारांवर आहे. त्यामुळे कार्यालयातील रिक्त जागा भरण्याची गरज असून, काही महिन्यांपासून कोणत्याही उपनोंदणी कार्यालयातून नोंदणी करून घेण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे कार्यालयात गर्दी वाढली आहे.

विवाह नोंदणीकडे कल वाढला

काही वर्षांपासून विवाह नोंदणी करून घेण्याकडे युवक-युवतींचा कल वाढला आहे. या ठिकाणी सकाळपासूनच काही जोडपी विवाह नोंदणी करून घेण्यासाठी आले होते.

बेळगाव दक्षिण उपनोंदणी कार्यालयातील उपनोंदणी अधिकारी विष्णू तीर्थ हे ३१ मे रोजी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांची जागा रिक्त आहे. सध्या त्यांच्या अतिरिक्त कामाचा बोजा प्रथम दर्जाच्‍या सहायकावर आहे.

कार्यालयातील कर्मचारी असे

  • अनेक वर्षांपासून कार्यालयात कंत्राटी कामगारांची भरती

  • कायमस्वरूपी कर्मचारी हाताच्या बोटावर मोजण्या इतके

  • सध्या प्रथम दर्जा सहायक व द्वितीय दर्जा यांची प्रत्येकी एक जागा कायमस्वरूपी

  • सहा कर्मचारी कंत्राटी आहेत.

Belgaum Registrar Office crowd
Belgaum News : ‘कॅन्टोन्मेंट’च्या वेबसाईटवर चुकीची माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.