सोलापूर ः अनेक अडथळे पार करीत गोरमाळे (ता. बार्शी) येथील डॉ. नवनाथ कसपटे यांनी विकसित केलेल्या एनएमके-एक (गोल्डन) या सीताफळ वाणाला पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायद्यान्वये अल्पसंख्याक स्वामित्व हक्क (पेटंट) प्राप्त मिळाला आहे.
सीताफळाच्या विक्रमी उत्पादनाबरोबरच गेले 45 वर्षे कसपटे यांनी सीताफळाचा प्रचार, प्रसार व्हावा म्हणून आयुष्य खर्ची घातले आहे. एनएमके-एक (गोल्डन) या वाणाची नोंदणी व्हावी यासाठी 2012 पासून ते प्रयत्नशील होते. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र अशा विविध स्तरांवर त्यांनी प्रयत्न केले. भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाकडे असलेल्या फळांच्या अधिसूचित सीताफळाचे नावच नव्हते. अधिसूचित सीताफळाचे नाव घालावे म्हणून पत्रव्यवहार केला. अधिसूचित 2015 ला नाव आल्यानंतर त्यांनी पेटंटसाठी अर्ज केला. त्यानंतर 2016 मध्ये हिसारगट्टा (बंगळुर) येथील शास्त्रज्ञ डॉ. टी. शक्तीवेल व रविकुमार शर्मा यांनी कसपटे यांच्या मधुबन नर्सरीची पाहणी केली. एनएमके-एक (गोल्डन) याविषयी अहवाल तयार केला. त्यानंतर त्यांना नुकताच स्वामित्व हक्क मिळाला आहे.
या वाणावर कृषी शास्त्रतज्ज्ञ सुधीर प्रतापसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली योगे गुप्ता या विद्यार्थ्याने पीएच.डी. केली आहे. सीताफळातील एकूण कामाबद्दलच बंगळुरच्या विद्यापीठाने 2018 मध्ये मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मान केला. स्वामित्व हक्क प्राप्त झाल्यामुळे या वाणाची किंवा त्याचे नाव बदलून रोपांची विक्री करणाऱ्या देशातील रोपवाटिकांवर कारवाई करण्याचा अधिकारही त्यांना मिळाला आहे. त्यांच्या परवानगीशिवाय या वाणाच्या रोपांची निर्मिती, विक्री, जाहिरात, वितरण, आयात व निर्यात कोणालाही करता येणार नाही.
कसपटे यांनी सीताफळाची बाग केल्यानंतर 1992 मध्ये अडीच किलो वजनाच्या ऍनोना-2 हे सीताफळ चर्चेचा विषय ठरले होते. त्यानंतर रोपांची मागणी होऊ लागल्यावर 1997 मध्ये मधुबन नर्सरी सुरू केली. सध्या देशातील ती सीताफळाची सर्वांत मोठी नर्सरी असल्याचे म्हटले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.