दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष, सहकाररत्न रावसाहेब पाटील यांचे निधन; वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रावसाहेब पाटील यांनी जैन समाजासह इतर समाजासाठी विविध क्षेत्रात मोठे काम केले आहे.
Arihant Udyog Group Raosaheb Patil Passed Away
Arihant Udyog Group Raosaheb Patil Passed Awayesakal
Updated on
Summary

रावसाहेब पाटील (Raosaheb Patil Passed Away) यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना बेळगाव येथील हॉस्पिटलमध्ये उचारासाठी दाखल करण्यात आले होते.

निपाणी : बोरगाव येथील रहिवासी, दक्षिण भारत जैन सभेचे (South India Jain Sabha) अध्यक्ष, अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक, सहकारत्न रावसाहेब अण्णासाहेब पाटील (दादा) (वय ८१) यांचे मंगळवारी (ता. 25) निधन झाले.

रावसाहेब पाटील (Raosaheb Patil Passed Away) यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना बेळगाव येथील हॉस्पिटलमध्ये उचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू असताना काही काळ त्यांनी प्रतिसाद दिला होता; पण सोमवारपासून उपचाराला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आज, मंगळवारी (ता. 25) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Arihant Udyog Group Raosaheb Patil Passed Away
Government Scheme : 'अन्नभाग्य'चे पैसे बँक खात्यात जमा होण्यास अखेर सुरुवात; नेमकी काय आहे सरकारची ही योजना?

रावसाहेब पाटील यांनी जैन समाजासह इतर समाजासाठी विविध क्षेत्रात मोठे काम केले आहे. त्यांनी दक्षिण भारत जैन सभेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. शैक्षणिक, धार्मिक, सहकार, कृषी क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. याशिवाय अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्था (Arihant Credit Souhard Sanstha), अरिहंत सूत गिरणी, आर. ए. पाटील कॉन्व्हेंट, प्राथमिक, माध्यमिक शाळा, बोरगाव पीकेपीएस, अरिहंत दूध डेअरी 'अरिहंत शुगर्स'च्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, बेरोजगार, ऊस उत्पादक, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी भरीव कार्य केले आहे.

सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखाशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे ते आजातशत्रू म्हणून ओळखले जात होते. कोरोना, वादळी वारे, अतिवृष्टी, आणि महापूर काळात संकटात सापडलेल्या नागरिकांना स्वतः मोफत रुग्णवाहिका, घरांची दुरूस्ती, जीवनावश्यक वस्तू देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली होती. त्यांच्या मागे पत्नी मीनाक्षी पाटील, दोन मुले राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाचे नेते उत्तम पाटील, अरिहंत समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com