तळेगाव दिघे (जि. नगर) : उत्तर नगर जिल्ह्यातील भंडारदरा व निळवंडे धरणांचे एकुण १९.३५९ टी.एम.सी. इतके पाणी फक्त भंडारदरा धरणांतर्गतच्या सुमारे ७५ हजार एकर लाभक्षेत्रास दिले जात आहे. निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे सरासरी फक्त १५ ते २० टक्के इतकीच पूर्ण झालेली असल्याने मंजुर लाभक्षेत्रास सिंचनाचा फायदा मिळत नाही. निळवंडे धरण पूर्ण झाले, मात्र प्रवाही सिंचन निर्मिती करण्यात अपयश आल्याने दुष्काळी भाग पाण्यापासून वंचित राहत आहे.
निळवंडे प्रकल्पाच्या मुख्य धरणाच्या बांधकामाबरोबरच कालव्यांची कामे देखील त्याच प्रमाणात होणे आवश्यक होते, मात्र पुर्नवसन व भुसंपादनामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या, अडचणी व विरोध यामुळे कालव्याची कामे पुर्ण करण्यात अडचणी आल्या. तरी देखील प्रवाही सिंचन निर्मितीसाठी म्हणजेच पर्यायाने कालव्यांची कामे पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक होते. मात्र तसे न घडल्याने निळवंडे धरणात पुर्ण क्षमतेने पाणीसाठा होऊन देखील प्रवाही सिचंन निर्मिती अभावी १८२ दुष्काळी गावांमधील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित राहिला.
निळवंडे प्रकल्पाचे कालवे व वितरण व्यवस्था निर्माण करण्यासाठी अजुनही भरीव निधीची आवश्यकता आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या व जनतेच्या आंदोलनाची दखल घेवुन शासनाने निळवंडे प्रकल्पाच्या २३७० कोटी रुपये रकमेच्या चतुर्थ सुप्रमा प्रस्तावास मान्यता प्रदान करुन या प्रकल्पाच्या उर्वरीत कामांसाठी खर्च करण्याचा मार्ग मोकळा केला. मात्र केंद्र सरकारकडुन या प्रकल्पासाठी निधी मिळविण्यासाठी जलसंपदा विभागाकडुन पुरेशे प्रयत्न केले करण्यात आले नाहीत. सदयस्थितीत निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रामधील प्रस्थापित लोकप्रतिनिधींमध्ये आरोप - प्रत्यारोपांची जुगलबंदी सुरु असते. त्यामुळे निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण होवून लाभक्षेत्रातील १८२ गावांना पाणी कधी मिळणार ? हा प्रश्न शेतकरी विचारीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.