Dandoba Temple : 1 हजार हेक्टरमध्ये पसरलेल्या डोंगरावर आहे प्राचीन दंडोबा मंदिर; गुहेतच आहेत नागाच्या वेटोळ्यातील मूर्ती!

बांधकाम शैली पाहिल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली नाही, हे निश्चित!
Dandoba Temple
Dandoba Templeesakal
Updated on
Summary

दंडोबावर किल्ला नसल्यामुळे शिखराचे बांधकाम नेमके कोणत्या उद्देशाने व कोणत्या काळात झाले, याचे संदर्भ उपलब्ध नाहीत.

सांगली : डोंगर पोखरून गुहेत बांधलेलं मंदिर...गुहेतच नागाच्या वेटोळ्यातील मूर्ती...प्रदक्षिणा घालण्यासाठी हाताने कोरल्यासारखे भुयार...समोर दगडात कोरलेला मंडप...वर तीनशे वर्षांपूर्वीचे पाचमजली शिखर पंचक्रोशीला साद घालत असल्यासारखे...हे चित्र आहे श्रीक्षेत्र दंडोबावरील (Dandoba Hills).

मिरज तालुक्यातील भोसे, सिद्धेवाडी, मालगाव, खंडेराजुरी व कवठेमहांकाळ तालुक्यातील खरशिंग अशा पाच गावांच्या हद्दीत १ हजार १५० हेक्टरवर पसरलेल्या डोंगरावर दंडनाथाचं पुरातन मंदिर एक उंचीवरचं देवस्थान आहे. प्राचीन काळातील अनेक ऐतिहासिक अवशेष कालौघात पुसट झालेत. डोंगर ते पायथा ६ किलोमीटरचा रस्ता आहे. शिवलिंगाला दोन वर्षांपूर्वी वज्रलेप केल्याने झळाळले आहे.

Dandoba Temple
हिरवीगार भातशेती, मंद वाहणारा वारा अन् पांढरेशुभ्र धबधबे..; पश्चिम भागात निसर्गाची मुक्तपणे उधळण, सौंदर्याने सुखावले पर्यटक

मंदिराबाहेर गुहेतच नंदी व अन्य देवतांच्या मूर्ती आहेत. येथे कायम धुनी असून प्रज्वलित ठेवली जाते. काही वर्षांपूर्वी ‘क’ वर्ग पर्यटनस्थळांत समावेश झाला. कच्च्या रस्त्याचे डांबरीकरण झाले. गुहेच्या दर्शनी भागात सभामंडप बांधला आहे. केदारलिंग, गुप्तलिंग या गुहांसह शिखराकडे जाण्याचा मार्गही सुस्थितीत केला.

Dandoba Temple
Health Tips : हिंदू धर्मात बाळाचे कान का टोचतात? आरोग्यावर काय होतो परिणाम? जाणून घ्या वैज्ञानिक आणि धार्मिक कारणे

विहिरीद्वारे पिण्याच्या पाण्याची सुविधा झाली. अर्थात, कामे करताना काही प्राचीन अवशेषही नष्ट झाले. श्रावणी सोमवारसह अमावस्या, प्रदोष, महाशिवरात्रीदिवशी भाविक मोठ्या संख्येने येतात. पश्चिम महाराष्ट्रासह परदेशी पर्यटकांनाही जैवविविधतेची भुरळ पडते. प्राणी, पक्षी व फुलांच्या विविध प्रजातींनी समृद्ध डोंगर पावसाळ्यात नटलेला असतो.

Dandoba Temple
Kolhapur Ganeshotsav : गणेश मंडळांसाठी महत्वाची बातमी! आता मिरवणुकीसाठी असणार 'लकी ड्रॉ'; शिस्तीसाठी पोलिसांचा निर्णय

गोलघुमट, सांगलीचे दर्शन

डोंगरमाथ्यावरचे शिखर आजही इतिहासाचा साक्षीदार म्हणून सुस्थितीत आहे. पुजारी, जाणकारांच्या मते, शिखर मंदिराचं आहे. दंडोबावर किल्ला नसल्यामुळे शिखराचे बांधकाम नेमके कोणत्या उद्देशाने व कोणत्या काळात झाले, याचे संदर्भ उपलब्ध नाहीत. हा भाग प्रदीर्घ काळ आदिलशाहीमध्ये होता.

बांधकाम शैली पाहिल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली नाही, हे निश्चित. पाचमजली शिखरातील सर्वांत वरच्या भागात चार-पाच माणसे उभी राहू शकतील, एवढी जागा आहे. शिखरावर गेल्यावर १०० किलोमीटरचा प्रदेश दृष्टिपथात येतो. वातावरण, हवामान स्वच्छ असेल तर येथून विजापूरच्या गोलघुमटाचं शिखर, तसेच सांगलीचा साखर कारखानाही नजरेस पडतो.

Dandoba Temple
Aamir Khan in Sangli : 'तिळगंगा'बाबत अभिनेता आमिर खाननं घेतला महत्वाचा निर्णय; लवकरच देणार करमाळेला भेट

वन डे ट्रेकिंग...फुल्ल एन्जॉय

दंडोबा डोंगरावर जाण्यासाठी अनेक रस्ते आहेत. ट्रेकिंगची आवड असलेले अनेकजण सिद्धेवाडीकडून ट्रेक करतात. कुटुंबासह ट्रीप फुल्ली एन्जॉय करायची असेल तर सिद्धेवाडीकडून डोंगराचा पायथा लागतो. त्या बाजूने केलेला ट्रेक एक अविस्मरणीय अनुभव देतो. त्याचप्रमाणे पायथ्यापासून सुरवात करून डांबरी रस्त्यावरून अनेकजण पायी मंदिरापर्यंत जातात. पावसाळ्यात येथे निसर्गप्रेमी, तसेच पर्यटकांची रेलचेल असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.