बेळगाव : कोरोनाच्या संकटामुळे (Corona)पुन्हा एकदा शाळा बंद होणार (School closed again)असल्याच्या चर्चाना उत आला आहे. मात्र शाळांबाबत पालकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून काही पालकांनी काळजी घेत शाळा सुरू ठेवाव्यात तर काही पालकानी शाळा बंद कराव्यात अशी मागणी केली आहे. मात्र शाळांबाबतचा अंतिम निर्णय येत्या एक-दोन दिवसात घेतला जाणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याचे निर्णयाकडे(education department) पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर काही दिवसांपासून शाळा पूर्वपदावर आल्या आहेत. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्यातील काही भागात विद्यार्थ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा शाळा बंद होणार असल्याची चर्चा सुरू झाली असून शिक्षण शिक्षण खात्यानेही तशा प्रकारचे संकेत दिले आहेत. तसेच शाळा पुन्हा बंद झाल्या तर विद्यागम योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना शिकविले जाणार आहे त्यादृष्टीने तयारी करण्याची सूचना शिक्षण खात्यातर्फे करण्यात आली आहे. मात्र जास्त दिवस शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने पुन्हा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी शाळा सुरू राहाव्यात असे मत अनेक पालकांमधून व्यक्त होत आहे. तर विद्यार्थ्यांचे लसीकरण न झाल्याने शाळा पुन्हा बंद कराव्यात आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे मतही व्यक्त होऊ लागले आहे. शिक्षण खात्याकडून विविध जिल्ह्यांमधील कोरोना स्थितीचा आढावा घेतला जात असून आरोग्य खात्याशी चर्चा करून शाळांबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे. अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे त्यामुळे शिक्षण खाते कोणता निर्णय घेते यावर शाळांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.(Belgaum news)
अनेक दिवसानंतर काही महिन्यांपूर्वीच शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा शाळांबाबत निर्णय घेताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन निर्णय घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन शाळा सुरू ठेवता येतील का याचा विचार झाला पाहिजे.
-जगनाथ चव्हाण पाटील, पालक
ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन शिक्षण विद्यार्थ्यांना लाभदायक ठरते. त्यामुळे शाळा सुरू राहणे गरजेचे आहे मात्र शाळा सुरू होताना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दखल घेणे आवश्यक आहे. लहान वयातील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. यासाठी पालकांनीही नियम पाळणे गरजेचे आहे.
-संतोष संकण्णावर, पालक
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये या दृष्टीने शाळांबाबतचा निर्णय घ्यावा. तसेच विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करता त्यांच्या मध्ये सकारात्मकता निर्माण करणे गरजेचे आहे.
-सचिन कणूकले, पालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.