नगर : सोशल मीडियात प्रचार कसा करावा, हे आम आदमी पार्टीकडून शिकलं पाहिजे. या पक्षाचं नाव आम आदमी पार्टी असलं तरी त्यांची रणनीती निश्चित सामान्य नाही. केवळ सोशल मीडियातील प्रचारामुळे त्यांनी मतदारांसोबतच इतर राज्यांचेही लक्ष वेधून घेतले आहे. सध्या दिल्ली वातावरण थंडगार असले तरी तेथील निवडणुकीच्या प्रचारामुळे गरम झाले आहे. आम आदमी पार्टीच्या सोशल सेलने बनवलेल्या मिम्समुळे त्या वातावरणात उकळी फुटली आहे. विरोधी भारतीय जनता पार्टी त्यामुळे काही प्रमाणात बॅकफूटवर गेली आहे. काही मिम्स मात्र, त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहेत. त्यामुळे त्यांना कोर्टात खेचण्यात आलं आहे.
हेही वाचा- बघा, त्याने ड्युटीसाठी बॉसचा मर्डर केला
मिम्स आणि मजेदार व्हिडिओ बनविण्यासाठी त्यांनी बॉलीवूड आणि व्हॉलीवूटपटाचा आधार घेतला आहे. क्रिएटिव्ह टीमने बनवलेले व्हिडिओ चांगलाच धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे भरथंडीतही भाजपला त्यांनी घाम फोडला आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून आम आदमी पार्टीचा सोशल मीडियात "राडा' सुरू आहे. पक्षाच्या ट्विटर हॅंडलवर त्यांनी अवेंजर्स एंडगेम या चित्रपटाचा स्क्रिनशॉट टाकला होता. आपवेंजर्स असेंबल अशी ओळ त्याला जोडली होती. त्या फिल्ममध्ये अवेंजर्स असेंबल असा डायलॉग होता. त्याचा त्यांनी पुरेपूर वापर केला.
आपवर 500 कोटींचा दावा
काही दिवसांनंतर बॉलीवूडमधील कल हो ना हो या चित्रपटातील एका सीनवर मिम बनवला होता. त्यावर मनोज तिवारी एमसीडीचा खाली येणारा रिपोर्ट वाचित आहे, अशी कॅप्शन दिली होती. त्यानंतर आला तो मनोज तिवारीच्या चित्रपटातील लगे रहो केजरीवाल असं गाणं असलेला व्हिडिओ. त्यामुळे मोठी खळबळ माजली. दिल्ली भाजपचे मनोजकुमार यांनी आपवर 500 कोटींचा दावा ठोकला. तरीही आपने मिम्स बनवणं काही थांबवलेले नाही. आता ही रणनीती भाजपने अवलंबिली आहे. त्यांनी आपचा डाव त्यांच्यावर उलटविण्यासाठी आपला सोशल सेल कामाला लावला आहे. शाहरूख खानच्याच बाजीगर चित्रपटाचा मिम्स त्यांनी बनवला आहे. त्यात शाहरूखने व्हिलनचे काम केले आहे. केजरीवाल हे दिल्लीसाठी व्हिलन ठरत आहेत, असे ट्विट दिल्ली भाजपच्या हॅंडलवरून करण्यात आले आहे.
कोण करतं हे सगळं?
काहीही असलं तरी या मिम्समुळे संपूर्ण देशवासियांची करमणूक होत आहे. विशेषतः सोशल मीडियात त्यांची चलती आहे. विशेष म्हणजे केवळ 23 वर्षांच्या अभिजीत दिपके याने भाजपला मिम्सद्वारे हैराण केले आहे. विशेष म्हणजे तो पुणेकर आहे. मी पार्टीसाठी अनेक दिवसांपासून काम करीत असल्यानेच मला क्रिएटिव्ह कंटेंट सूचतो. आपचा आयटी हेड अंकितचे असे म्हणणे आहे की, 2013 ते 2015 या कालावधीत न्यूज क्लिप आणि छायाचित्रांची चलती होती. आता व्हिडिओ लोकांना आवडतात. या कल्पनाशक्तीमुळेच फेसबुक, ट्विटर, यू ट्यूब, इन्स्टाग्राम, टीकटॉक आणि शेअरचॅटवर आपला मोठे फॉलोअर्स आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.