छ. शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या नावाने बांधलेली कमान अचानक प्रशासनाने पाडली आहे.
सांगली : बेडग (ता. मिरज) गावात परवानगी घेऊन बांधलेली शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या नावाने बांधलेली कमान अचानक प्रशासनाने पाडली आहे. याबाबत महिनाभर आंदोलन केले. मात्र, त्यांची कोणीच दखल घेतली नसल्याने बौद्ध समाजातील (Buddhist Community) ग्रामस्थांनी गावच सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. यावर तोडगा न निघाल्यास राज्य या आंदोलकांच्या पाठीशी उभा करू, असा इशारा सर्व पुरोगामी संघटनांकडून देण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. भारत पाटणकर (Bharat Patankar) यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ॲड. सुभाष पाटील, प्रा. दादासाहेब ढेरे, धनाजी गुरव, बाबूराव गुरव, ज्योती अदाटे, दिगंबर कांबळे, विकास मगदूम, गौतम काटकर, सुरेश दुधगावकर, किरण कांबळे, डॉ. रवींद्र श्रावस्थी, डॉ. संपत गायकवाड, डॉ. संजय पाटील आदींसह पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. पाटणकर म्हणाले, "बेडग येथे उभारलेली कामान पोलिस संरक्षणात पाडल्याने सगळे समाजबांधव घरांना कुलूप लावून गावाबाहेर पडलीत. ग्रामपंचायतीने २००२ मध्ये ठराव घेऊन परवानगी दिली. पुन्हा २००८ मध्ये लोकवर्गणीतून काम पूर्णचा परवाना दिला. ३ जानेवारी २०२३ रोजी ग्रामपंचायतीने पुन्हा जागा निश्चितीसह परवानगी दिली.
त्यानंतर बांधकाम सुरू झाले, याला कोणीही गावातील लोकांनी विरोध केला नाही. मात्र, अचानक अधिकारी, पोलिस प्रशासनाने येऊन कमान पाडली. याविरोधात गावातील लोकांनी आम्हाला कोणी वाली नाही, म्हणून मंत्रालयाकडे कूच केली आहे.
गावातील लोक विरोध करत नाहीत, पण साथ मिळत नसल्याने गाव सोडण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला. गावागावांत शोषित समाज आहे, त्यामुळे वेगवेगळ्या पुरोगामी संघटना आम्ही सर्व लोक तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही आमदार जयंत पाटील यांच्याशी संपर्क केला असून त्यांनी पाठपुराव्याचे आश्वासन दिले आहे.
विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा पालकमंत्री सुरेश खाडे यांनी याबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही. खासदार याबाबत काहीच केलं नाही, प्रशासनाने देखील भूमिका घेतली नाही, त्यामुळे आंदोलनाचा संविधानिक मार्ग निवडावा लागला, असे बाबूराव गुरव यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.