Private School : 'RTE' प्रवेशाकडे 600 विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ; निवड होऊनही घेतला नाही शाळेत प्रवेश!

दरवर्षी खासगी शाळांतील २५ टक्के प्रवेशाच्या जागा राखीव ठेवल्या जातात.
RTE Private School
RTE Private Schoolesakal
Updated on
Summary

‘आरटीई’अंतर्गत प्रवेशासाठी राज्यातील ८८२४ शाळांमध्ये १ लाख १ हजार ८४७ जागा राखीव आहेत.

सांगली : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) खासगी शाळांतील (Private School) २५ टक्के राखीव जागांवर निवड होऊनही या वर्षी जिल्ह्यातील ६०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. त्यामुळे या जागा रिक्त राहिल्या आहेत. नियमित प्रवेशासह चारवेळा प्रतीक्षा यादीतून १२८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

राज्य सरकारने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा (Right to Education Act) अर्थात २००९च्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश व शिक्षण देण्यासाठी दरवर्षी खासगी शाळांतील २५ टक्के प्रवेशाच्या जागा राखीव ठेवल्या जातात. प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे याची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते.

जिल्ह्यातील २२६ शाळा ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के प्रवेशांसाठी पात्र होत्या. त्यानुसार १८८६ जागा वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशास उपलब्ध होत्या. या १८८६ जागांसाठी ऑनलाइन अर्ज केले होते. सर्व्हर डाऊनच्या कारणामुळे दोन-तीन वेळा अर्जास मुदतवाढही देण्यात आली होती. अंतिम मुदतीपर्यंत १८८६ जागांसाठी ३१४४ विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. यातून पहिल्या टप्प्यात १५२८ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. यापैकी १०३९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.

RTE Private School
Udayanraje Bhosale : महापुरुषांच्या बदनामीविरोधात उदयनराजे आक्रमक; अमित शहांकडे केली 'या' कडक कायद्याची मागणी

त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. यात पहिल्या यादीत ३३१ पैकी १८६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. त्यानंतर दुसऱ्या यादीत ८९ पैकी ३९ विद्यार्थ्यांनी, तिसऱ्या यादीत ३० पैकी १३, तर चौथ्या यादीत १५ पैकी आठ जणांनी प्रवेश घेतले. असे एकूण १२८५ विद्यार्थ्यांनी यंदा ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश घेतले. मात्र, ५९९ जागा रिक्त राहिल्या आहेत. ही आकडेवारी एकूण जागांच्या सुमारे ३२ टक्के इतकी आहे.

राज्यात १९ हजार जागा रिक्त

जागा रिक्त राहण्याचे प्रमाण मोठे आहे. ‘आरटीई’अंतर्गत प्रवेशासाठी राज्यातील ८८२४ शाळांमध्ये १ लाख १ हजार ८४७ जागा राखीव आहेत. या जागांसाठी ३ लाख ६४ हजार ४१३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १ लाख ३४ हजार ४२० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यातील ८२ हजार ७७१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, तर १९ हजार ०७६ रिक्त राहिल्या आहेत. एकूण जागांच्या सुमारे १९ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. नियमित प्रवेश आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी अशा एकूण ८२ हजार ४५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत, तर १९ हजार ३९४ जागा रिक्त राहिल्या आहेत.

RTE Private School
रत्नागिरीच्या राजकारणात लवकरच दिसणार बालमित्रांची जोडी; NCP जिल्हाध्यक्षांचा शिंदे गटातील प्रवेश जवळजवळ निश्चित!

दुष्काळी तालुक्यांत ५५ टक्के रिक्त जागा

जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर आणि तासगाव या दुष्काळी तालुक्यात रिक्त जागांचे प्रमाण अधिक आहे. खरं तर या भागातून ‘आरटीई’चा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांनी घेण्याची आवश्‍यकता होती. प्रत्यक्षात या पाच तालुक्यांत ६७ शाळा आरटीईसाठी पात्र होत्या. यामध्ये ४९३ जागा वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. मात्र, फक्त २२० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून २७३ जागा रिक्त आहेत. आकडा ५५ टक्के इतका आहे.

जागा रिक्त राहण्याची कारणे...

वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली असतानाही जागा रिक्त राहत आहेत, हे धक्कादायक आहे. या मागच्या कारणांची माहिती घेतली असता, आपल्या पसंतीच्या शाळेत प्रवेश न मिळणे, घरापासून जवळच्या शाळेत प्रवेश न मिळणे अशी कारणे समोर येत आहेत.

RTE Private School
'जनतेची काळजी असलेल्या राहुल गांधींनाच देशाचा पंतप्रधान बनवा'; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

तालुकानिहाय आरटीईच्या जागा

तालुका पात्र शाळा राखीव जागा प्रवेशित जागा

  • आटपाडी १२ ६९ १५

  • जत १४ १०७ २७

  • कवठेमहांकाळ १३ ८६ ५५

  • खानापूर १७ १२२ ८२

  • मिरज ३४ २३६ १६१

  • पलूस २० १७२ १३१

  • शिराळा ८ ६० ५४

  • तासगाव ११ १०९ ४१

  • वाळवा ५१ ३८४ २३३

  • कडेगाव ८ ३३ २४

  • मनपा ३८ ५०८ ४६१

  • एकूण २२६ १८८६ १२८५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.