ऐतिहासिक वारसा लाभलेलं 'धर्मगिरी तीर्थक्षेत्र'; जैन धर्मियांची आहे पावन भूमी, या ठिकाणी कसे पोहोचाल?

१३ जानेवारी १९७२ रोजी धर्मसागर महाराजांनी समाधी घेतली. तेव्हापासून पुण्यस्मरण दिवस साजरा केला जातो.
Dharmagiri Pilgrimage Shirala
Dharmagiri Pilgrimage Shiralaesakal
Updated on
Summary

पुणे-बंगळूर महामार्गावर असणारे हे तीर्थक्षेत्र पुण्यापासून सातारा, कऱ्हाडनंतर कासेगावपासून दहा किलोमीटरवर वाटेगावच्या पश्चिमेला आहे.

धर्मगिरी तीर्थक्षेत्र (Dharmagiri Pilgrimage Shirala) हे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बांबवडे, वाटेगाव, टाकवे येथील अलौकिक धार्मिक ठिकाण आहे. हे धर्मगिरी तीर्थक्षेत्र भाविकांचे श्रद्धास्थान, सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक वारसा लाभलेले आहे. येथे धर्मनाथ तीर्थंकरांचे मंदिर (Dharmanath Temple) आहे.

धर्मनाथ तीर्थंकरांची तेजस्वी मूर्ती आहे. शेजारीच संभवनाथांची मूर्ती असलेल्या मंदिराचे काम सुरू आहे. भगवंत पार्श्वनाथ मंदिर लक्षवेधी आहे. सभामंडप, मानस्तंभ आहे. त्यागी निवास, भक्तनिवास, व्रतीनिवास, गुरुकुल, वसतिगृह, गोशाळा, युवकांसाठी तालीमही आहे.

Dharmagiri Pilgrimage Shirala
'ठराव करताना आम्हाला विश्‍वासातच घेतलं नाही'; डाॅ. आंबेडकर कमान पाडल्याप्रकरणी सात सदस्यांचा मोठा दावा

थोर शाहीर व कविरत्न धर्मसागर मुनी महाराजांचे येथे वास्तव्य होते. त्यांनी मानवी कल्याणासाठी लेखन केले. कविरत्न धर्मसागर मुनी महाराजांनी वाटेगाव, बांबवडे, टाकवे परिसर समृद्धीचे काम केले. जैन समाज एकत्र करून ज्ञानदान केले. जैन धर्माबद्दलचे (Jainism) ज्ञान, संस्कार, धर्माची माहिती सांगितली. लोकप्रबोधन केले. धर्मसागर महाराजांचा विहार येथे असे. त्यांच्या पदस्पर्शाने भूमी पावन झाली. १३ जानेवारी १९७२ रोजी धर्मसागर महाराजांनी समाधी घेतली. तेव्हापासून पुण्यस्मरण दिवस साजरा केला जातो.

येथे धर्मसागर मुनी महाराजांची समाधी आहे. सन १९९८ मध्ये बांबवडे येथील पा. रा. पाटील यांनी ११ फूट उंचीची भगवान धर्मनाथ तीर्थंकरांची मूर्ती दिली. पंचकल्याणक महोत्सव झाला. सांगली, सातारा, कोल्हापूरपासून बेळगावपर्यंत महत्त्व वाढले. अनेक राज्यांतून साधक येतात.धर्मसागर मुनी महाराज गिरिस्थानावर ध्यानासाठी येत. शिष्यांनी दगडी गुंफा बांधून दिली. सन २०१४ मध्ये सुखसागर महाराजांच्या वास्तव्याने भूमी पावन झाली. त्यांनी सन २०१४ मध्ये यमसंल्लेखना घेतली.

Dharmagiri Pilgrimage Shirala
Gokul Dudh Sangh : 'गोकुळच्या प्रगतीला कोणाचीही दृष्ट लागू देऊ नका'; असं का म्हणाले अजितदादा?

‌आचार्य वर्धमानसागर महाराज व निर्यापक श्रमण धर्मसागर महाराजांनी तीर्थक्षेत्राचा विकास केला. निर्यापक श्रमण विद्यासागर महाराज, निर्यापक श्रमण सिद्धांत सागर महाराज व मुनी संघांच्या उपस्थितीत २७ जानेवारी ते १ फेब्रुवारी कालावधीत श्री १००८ श्रीमज्जिनेंद्र आदिनाथ भगवंत यांची १७ फूट व भरत भगवंत व बाहुबली भगवंत यांच्या २१ फूट मूर्ती उभ्या आहेत.

या भूमीला त्यागी मुनीच्या संस्कृती, विचार व सिद्धांतांची परंपरा आहे. विसाव्या शतकात आचार्य शांतिसागर महाराजांनी प्रबोधन केले. शिष्यपरंपरेतील कविवर्य धर्मसागर मुनी महाराजांनी प्राणिमात्रांच्या कल्याणाचेही कार्य केले. ध्यानसाधना, पोवाडे, कीर्तनांची रचना केली. अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती व पवित्र जीवनाचा संदेश दिला. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व धर्मसागर महाराजांत काव्य, पोवाडा, कीर्तनाविषयी चर्चा होई.

Dharmagiri Pilgrimage Shirala
Sangli Politics : माजी महापौरांसह तीन माजी नगरसेवक अजितदादांच्या गटात; कोल्हापुरात ठरला प्लॅन

धर्मगिरीकडे जाण्याचा मार्ग

धर्मगिरी तीर्थक्षेत्र सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात आहे. पुणे-बंगळूर महामार्गावर असणारे हे तीर्थक्षेत्र पुण्यापासून सातारा, कऱ्हाडनंतर कासेगावपासून दहा किलोमीटरवर वाटेगावच्या पश्चिमेला आहे. कोल्हापूरपासून ते साठ किलोमीटरवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.