निपाणी : सोंग देव-देवतांचे अन्‌ भ्रांत पोटाच्या खळगीची

नांदेडमधील बहुरूपी कलाकारांची व्‍यथा; शासनाने मदतीचा हात देण्याची मागणी
nipani
nipanisakal
Updated on

निपाणी : पोटाची खळगी भरण्यासाठी संत-महात्मे, पोलिस आणि देवाचेही रूप घेतले. परंतु पोटाची समस्या मार्गी लागलेली नाही. शासन कलावंतांना मदत देते. पण ती मदत आम्हापासून कोसो दूरच असल्याची खंत बहुरुपी कलावंत व्यक्त करत आहेत. कोरोनामुळे दोन वर्षांपासून पोटापाण्याचा प्रश्न गंभीर आहे. नांदेडमधील कलाकारांची कुटुंबे निपाणी व परिसरात पोटासाठी वेगवेगळी रूपे घेऊन फिरत आहेत. ‘सकाळ’ने त्यांची भेट घेतली असता त्यांनी व्यथा मांडली.

nipani
प्रहारचा विजय नव्‍या राजकीय पर्यायाची नांदी!

पहाट झाली की वासुदेवाचे आगमन होत असे. रोज नवीन सोंग धारण करून समाजातील, ऐतिहासिक तसेच पौराणिक कथेतील पात्रांचे अभिनय करून मनोरंजन करायचे. गावागावांत रामलीलेच्या सादरीकरणातून नावलौकिक मिळवला. पिढ्यान् पिढ्या चालत आलेली ही कला एका पिढीतून दुसऱ्या पिढीत चालत आहे. काळाबरोबर मनोरंजनाच्या साधनांत झालेला बदल, समाजात वाढलेला शिक्षणाविषयीची जागरूकता आदी कारणांमुळे नवीन पिढीचा या कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. पूर्वीसारखा मान-सन्मान मिळत नसल्याने तसेच कलेच्या सादरीकरणातून दोनवेळेच्या जेवणाचीही सोय करताना बहुरूपी तारेवरची कसरत होत आहे. शासनाने अशा कलाकारांसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी त्यांच्यातून होत आहे.

nipani
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये 27 टक्के OBC आरक्षण कायम : SC

पोलिस तसेच देव-देवतांची रुपे साकारून शहरात तसेच गावात मनोरंजन(entertainment) करतो. दिवसाला २०० ते ३०० रुपये मिळतात. त्यातच जाण्या-येण्याचे तिकीट, सोंगासाठी येणारा खर्च आणि उरलेल्या पैशातून उदरनिर्वाह चालवावा लागत आहे.

- मधुकर श्रावण, बहुरुपी कलावंत, नांदेड

कलेला उतरती कळा

पूर्वी पोवाड्यातून देशप्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी या कलेचा उपयोग होत. गावातील हालचालींची माहिती पोचविण्यासाठीही कलेचा (artist news)उपयोग केला जात. परंतु राजेशाही संपली आणि कलेलाही उतरती कळा लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.