गोपीचंद पडळकर आणि अमरसिंह देशमुख यांच्यात फारसे सख्य नाही. एवढेच नव्हे, तर एकमेकांना शह-प्रतिशह देणे लपून राहिलेले नाही.
आटपाडी : आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख (Amar Singh Deshmukh) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सूतगिरणीच्या (Spinning Mill) प्रश्नावरून सोशल मीडियावर जोरदार खदखद सुरू आहे. यातून भाजपच्या या दोन गटांत आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले असून दोन्ही गटांतील दुफळी, दुरावा आणि संघर्ष अधिक तीव्र होण्याच्या उंबरठ्यावर आहे.
भाजपचे (BJP) आटपाडी तालुक्यात देशमुख आणि पडळकर असे गट आहेत. दोन्ही गट दखल घेण्याइतपत सक्षम आहेत. देशमुख गटाचे राजेंद्र देशमुख आणि अमरसिंह देशमुख हे बंधू नेतृत्व करतात, तर पडळकर गटाचे आमदार गोपीचंद पडळकर नेतृत्व करतात. देशमुखांच्या भाजपप्रवेशानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही गट एकसंध लढले.
ग्रामपंचायतीच्या निवडणुका (Gram Panchayat Election) कार्यकर्त्यांनी काही गावांत एकत्र, तर काही ठिकाणी स्वतंत्र लढल्या. बाजार समितीची निवडणूकही एकत्र लढली होती. दोन्ही गट वरकरणी तरी एकसंध होते. भाजपने अमरसिंह देशमुख यांची खानापूर विधानसभा मतदारसंघ प्रमुख म्हणून नेमणूक केली होती. त्याने देशमुख गटाला ऊर्जा मिळाली. मात्र चार महिन्यांपूर्वी भाजपने ती रद्द करून आमदार पडळकर यांची निवड केली. त्यामुळे देशमुख गट दुखावला गेला. त्यावरून उलटसुलट चर्चा झाली.
त्यावेळी माजी आमदार राजेंद्र देशमुख पाडळकर बंधूंशी सलोख्याचे संबंध ठेवून होते, तर पडळकर आणि अमरसिंह देशमुख यांच्यात दुरावा वाढला. अमरसिंह देशमुख यांचा आमदार दिवंगत अनिल बाबर यांच्याशी स्नेह वाढत गेला. तो पडळकर गटाला रूचला नाही. अशा विविध कारणांनी दोन्ही गटांत दुरावा वाढत गेली, मात्र ती बाहेर पडली नव्हती. मात्र आमदार पडळकर यांनी सूतगिरणीच्या व्यवहाराचा अधिवेशनात प्रश्न मांडून चौकशीची मागणी केली.
अमरसिंह देशमुख यांच्या अनेक कार्यकर्त्यांना रुचलेली नाही. त्यामुळे दोन्ही गटांची धुसफूस बाहेर पडून सोशल मीडियावर खदखद सुरू झाला आहे. गोपीचंद पडळकर आणि अमरसिंह देशमुख यांच्यात फारसे सख्य नाही. एवढेच नव्हे, तर एकमेकांना शह-प्रतिशह देणे लपून राहिलेले नाही. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनीही मनातील खदखद व्यक्त केली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी झडू लागल्या आहेत. कार्यकर्तेही एकमेकांची उणीदुणी काढत असून त्यांच्यातील सुप्त संघर्ष सोशल मिडियावर व्यक्त होऊ लागला आहे. त्यामुळे सध्या हा संघर्ष टिपेला पोहोचल्याचे दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.