पुणे ते हुबळी 'वंदे भारत' रेल्वे सुरू होण्याआधीच वादात; कर्नाटक-महाराष्ट्र दोन्ही राज्यातून विरोध, काय आहे कारण?

Pune to Hubli Vande Bharat Railway : ‘वंदे भारत’ ही गाडी गतिमान सेवेसाठी ओळखली जाते. या प्रयोगामुळे ही गाडी हुबळीतून पुण्यात पोहोचायला तब्बल अडीच तास विलंब होणार आहे.
Pune to Hubli Vande Bharat Railway
Pune to Hubli Vande Bharat Railwayesakal
Updated on
Summary

‘वंदे भारत’ रेल्वे गाडी कोल्हापूरला नेण्याच्या दबावाखाली पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकला जोडणाऱ्या पहिल्या ‘वंदे भारत’चा घोळ झाला आहे.

सांगली : बहुप्रतीक्षित पुणे ते हुबळी ‘वंदे भारत’ रेल्वे (Pune to Hubli Vande Bharat Railway) गाडी सुरू होण्याआधीच वादात सापडली आहे. या रेल्वेच्या मूळ मार्गात बदल करून मिरजेतून ही गाडी कोल्हापूरला नेऊन परत आणण्याचा ‘वाई मार्गे सातारा’ प्रयोग अंगलट येण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याला कर्नाटक (Karnataka) आणि महाराष्ट्र दोन्हीकडून विरोध सुरू झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.