घर-अंगणच हरवलेले उजळवणार दिवाळी

‘बेघर निवारा केंद्राचा उपक्रम ; दिवाळी साहित्याच्या विक्रीसाठी बेघरांनी मांडला स्टॉल
घर-अंगणच हरवलेले उजळवणार दिवाळी
Updated on

सांगली : ज्याचं स्वतःच घर नाही ते यंदाच्या दिवाळीत तुमच्या घरावरचा आकाश कंदील सजवणार आहेत. ज्याचं अंगण हरवलय ते तुमच्या दिवाळीचा तेजोमय दीप प्रज्वलीत करणार आहेत. ज्याच्या आयुष्याचा बेरंग झालाय तेच तुमच्या अंगणातील रांगोळीत रंग भरणार आहेत. घर आणि नात्याची वीण तुटलेले ‘बेघर’ दिव्यांच्या उत्सवाचा आनंद तुमच्या आनंदात शोधणार आहेत. त्यांनी लावलेला आकाश कंदील, रांगोळी आणि दिव्यांचा स्टॉल हे एक निमित्त आहे. आपण समाजापासून माणसांपासून दुरावलो नाही, याच प्रवाहाचा एक भाग आहोत, असा आशेचा किरण त्यांच्या मनात तेजवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. येथील सावली बेघर निवारा केंद्राततर्फे हा विक्रीचा स्टॉल लावण्यात आला आहे.

आपटा पोलिस चौकीजवळ इन्साफ फौंडेशन आणि महापालिकेतर्फे सावली बेघर निवारा केद्र उभारले आहे. २०१९ रोजी हे केंद्र सुरू केले. सध्या ७० वर जणांना इथे हक्काचा निवारा देण्यात आले. इथे आलेल्या काहींच्या डोक्‍यावर छत नाही. तर काहींना पोटाची खळगी भीक मागूनच भरण्याची वेळ आली होती. त्यांना आपुलकीचे असे कोणीही नाही. काहींना तर सर्व ऐश्‍वर्य असूनही रस्त्यावर येण्याची वेळ आली. तर काहींना कोठून आलो, याची माहिती नाही. असे एक ना अनेक प्रकार इथे आहेत. केंद्राचे प्रमुख मुस्तफा मुजावर यांच्या पुढाकारातून प्रत्येक सण, उत्सव याठिकाणी साजरा केला जातो. प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद देणारी दिवाळी ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गत वर्षीपासून पणत्या, आकाश कंदील, रांगोळी विक्रीचा स्टॉल लावण्यात येतो. यंदाही शहर पोलिस ठाण्याजवळील मित्र मंडळ चौका आणि आपटा पोलिस चौकीजवळ स्टॉल लावण्यात आला आहे. यासाठी महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त चंद्रकांत आडके, राहुल रोकडे, प्रकल्प व्यवस्थापक ज्योती सरवदे यांचा प्रोत्साहन दिले.

घर-अंगणच हरवलेले उजळवणार दिवाळी
लसीकरणातील योगदानासाठी परिचारिका भोसले यांचा सन्मान

अगदी वाजवी दरात उत्साहाने या वस्तूंची विक्री केली जात आहे. आज पहिल्याच दिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद यांना मिळाली. खरेदीसाठी येणारे अगदी अपुलकीने त्यांची विचारपुस करत आहेत. लोकांनी खरेदी केल्यानंतर स्टॉलचा फोट घेतल समाजमाध्यमांवरही खरेदीसाठी आवाहन करताना दिसत आहेत.

बेघरांना स्वबळावर उभारण्यासाठी गतवर्षीपासून हा उपक्रम राबवला जात आहे. समाजातून याला उत्स्फुर्त असा प्रतिसादही मिळतो आहे. महापालिकेने सहकार्यने यंदा दोन ठिकाणी हे स्टॉल लावले आहेच.

- मुस्तफा मुजावर, संस्थापक इन्साफ फौंडेशन, सांगली

‘‘ समाजातील वंचित कुटुंबातील मुलांनी बनवलेले आकाश कंदिल या स्टॉलवर मांडले आहेत. माफक दरातील आकाश कंदिल खरेदी करून या मुलांच्या शिक्षणासाठीही हातभार लावावा.’’

उज्ज्वला परांजपे

आकार फौंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.