Student Cycle : विद्यार्थिनींना मोफत सायकली भेट; डॉ. आंबेडकर यांना मिरजेत अनोखी मानवंदना

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीचे औचित्य साधून मिरजेत महापालिका शाळेतील विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.
Cycle Gift
Cycle GiftSakal
Updated on
Summary

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीचे औचित्य साधून मिरजेत महापालिका शाळेतील विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.

मिरज - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीचे औचित्य साधून मिरजेतील संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ महापालिका शाळेतील विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. समाजातील सर्व गरीब, कष्टकरी वंचित घटकांतील ४४ कुटुंबांतील मुलींना विद्यार्थिनींना स्थानिक नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी पदरमोड करून हे काम केले. मिरजेतील प्रभाग २० हा त्यांचा प्रभाग आहे. हा प्रभाग म्हणजे मिरजेतील कृष्णाघाट परिसर आहे, जो शहरांपासून सुमारे सहा किलोमीटर इतका दूर आहे. या मुलींनी रोजची होणारी धावपळ पाहून त्यांनी गतवर्षी डॉ. आंबेडकर जयंतीला हा संकल्प केला आणि आज तडीसही नेला. सायकली मिळाल्यानंतर मुलींच्या चेहऱ्यावर ओसंडणारा आनंदाची मोजमाप पैशांत करता येणारे नव्हते.

‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा डॉ. आंबेडकर यांनी समाजातील वंचितांना दिलेला ध्येयमंत्र पिढ्यांचा उध्दार करणारा आहे. यासाठी प्रत्यक्ष कृतीतून बळ देणारे पाऊल थोरात यांनी उचलले आहे. मिरजेतील कृष्णा घाट परिसरातील रोजगारासाठी शहरात आलेल्या स्थलांतरित कुटुंबाची मोठी संख्या आहे. या परिसरात पालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींना माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात येताना रोज पाच-सहा किलोमीटरची पायपीट करावी लागते. ही वेदना ओळखून श्री थोरात यांनी पालिका शाळांमध्ये शिकलेल्या प्रभागातील सर्व ४४ मुलींना पुढील माध्यमिक शिक्षण घेता यावे, यासाठी मदतीचा हात दिला आहे.

उपायुक्त स्मृती पाटील यांनी मुलींना लढण्याची जिद्दही दिली. थोरात यांनी प्रभाग २० मधील सर्व पालिका शाळांचा कायापालट करण्यासाठी गेली पाच वर्षे सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. शाळा क्रमांक सात सेमी इंग्लिश करण्यात आली आहे. आता या शाळेत प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी लागली आहे. श्री. थोरात स्वतः मुलांना शिकवण्यासाठी प्रयत्नशील असतात. वर्गखोल्या डिजिटल करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. गतवर्षी त्यांनी आरोग्य केंद्रातील २२ आशा वर्कर्संनाही सायकलींचे वाटप केले होते.

बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या साक्षीने सायकलींचे वाटप करण्याचा उद्देश केवळ त्यांना शिकण्याची प्रेरणा मिळावी, एवढाच आहे. हे काम मी केले, अशी माझी यत्किंचितही भावना नाही. ज्यांच्यामुळे कोटी कुळांचा उध्दार झाला, त्या बाबासाहेबांच्या स्मृतींना वंदन करण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.

- योगेंद्र थोरात, नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.