Government Scheme : पंजाबराव देशमुख निर्वाह भत्त्यात वाढ; वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
Dr. Panjabrao Deshmukh Hostel Subsistence Allowance Scheme
Dr. Panjabrao Deshmukh Hostel Subsistence Allowance Schemeesakal
Updated on
Summary

‘क’ वर्ग महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना भोजन भत्ता २८ हजार, निवास भत्ता १५ हजार, तर निर्वाह भत्ता ८ हजार रुपये मिळणार आहे.

सांगली : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उच्च शिक्षण घेणाऱ्या; मात्र वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत (Dr. Panjabrao Deshmukh Hostel Subsistence Allowance Scheme) शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

‘क’ वर्ग महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना (Students) ५१ हजार, तर जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ४३ हजार आणि तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ३८ हजार रुपये निर्वाह भत्ता मिळणार आहे. पात्र विद्यार्थ्यांच्या ‘आधार’ संलग्न बँक खात्यात हा भत्ता थेट वितरीत करण्यात येणार आहे.

Dr. Panjabrao Deshmukh Hostel Subsistence Allowance Scheme
रत्नागिरीत छत्रपती संभाजी राजेंचा महाराष्ट्रातील सर्वांत उंच पुतळा; काय आहे खासियत, किती आला खर्च?

शासनाच्या विविध विभाग, उपक्रम, महामंडळांमार्फत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचे निकष एकसारखे असावेत, याबाबत शिफारस करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या योजनांमध्ये; तसेच प्रस्तावित योजनांमध्ये एकसमानता राहावी, यासाठी धोरण निश्चित केले आहे. यात वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी किती रक्कम अदा करावी, याबाबतचे दर निश्चित करण्यात आले आहेत.

Dr. Panjabrao Deshmukh Hostel Subsistence Allowance Scheme
'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आसनाची त्यांनी किंमत केली, हे दुर्दैवी'; आमदार साळवींची हताश प्रतिक्रिया

हे दर उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येत असलेल्या विद्यार्थ्यांना लागू करण्यासही धोरणात मान्यता दिली आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्याहून कमी आहे, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व निर्वाह खर्च भागविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत हा लाभ मिळणार आहे. पात्र विद्यार्थ्यांच्या ‘आधार’ संलग्न बँक खात्यात थेट वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

Dr. Panjabrao Deshmukh Hostel Subsistence Allowance Scheme
Maratha Reservation : मराठा समाजाचे 98 टक्के सर्वेक्षण पूर्ण; 468 कुटुंबांनी दिला सर्वेक्षणास नकार

‘क’ वर्ग महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना भोजन भत्ता २८ हजार, निवास भत्ता १५ हजार, तर निर्वाह भत्ता ८ हजार रुपये मिळणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता २५ हजार, निवास भत्ता १२ हजार, तर निर्वाह भत्ता ६ हजार रुपये मिळणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता २३ हजार, निवास भत्ता १० हजार तर निर्वाह भत्ता ५ हजार असे एकूण ३८ हजार रुपये मिळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.