Dnyaneshwari : दुबईत साकारले ‘ज्ञानेश्‍वरी’चे हस्तलिखित; नितीन माने यांची दुबईसह इस्लामपूर, भोरमध्ये संकल्पपूर्ती

संत ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’ची भुरळ भल्याभल्यांना पडली. जिथे मराठी माणूस, तिथे ज्ञानेश्वरी पोहोचली.
Dnyaneshwar
Dnyaneshwarsakal
Updated on

इस्लामपूर - संत ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’ची भुरळ भल्याभल्यांना पडली. जिथे मराठी माणूस, तिथे ज्ञानेश्वरी पोहोचली. ज्याने ती वाचली, ऐकली, त्यांच्यात आध्यात्मिकदृष्ट्या बदल झाला आहे. मूळचे भारतीय, परंतु नोकरीनिमित्त दुबईत असलेल्या नितीन माने (मूळ इस्लामपूर) यांनी स्वहस्ताक्षरात ज्ञानेश्वरी लिहून हे सिद्ध करून दाखवले आहे.

माने सन २००५ पासून दुबईत राहत आहेत. आर्किटेक्चर मेकॅनिकल प्लंबिंग सर्व्हिसेससाठी ते प्रकल्प सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. ५२ वर्षीय मानेंचे कुटुंबीय पुण्याजवळ भोर तालुक्यात घोरडमसुली गावात राहतात. तेथे सिद्धयोगिनी वनकन्या अनुसयाताईंच्या आश्रमात पत्नी माधवी कार्यरत आहेत. मानेंच्या आई इस्लामपूरमध्ये राहतात. इकडे येणे-जाणे असतेच.

असेच एकदा इस्लामपुरात आल्यानंतर संभूआप्पा मठात दर्शनासाठी गेले. त्यांना ‘ज्ञानेश्वरी’शी संबंधित उपक्रम दिसला. त्यांनी चौकशी केली. दशरथ पाटील यांनी वडील रघुनाथ पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू केलेला संकल्प जाणून घेतला.

हस्तलिखित ज्ञानेश्वरीचा संकल्प करायचा आहे, अशांसाठी पाटील साहित्य पुरवतात. मानेंनी त्यांची घरी जाऊन भेट घेतली. त्यांचे काम पाहून भारावले. सन १९५३ ची जुनी ज्ञानेश्वरी व त्यांच्याकडील जुने संग्रह पाहिले आणि उपक्रमात सहभागाचा संकल्प सांगितला. दुबईत त्यांच्या पत्त्यावर दशरथ पाटील यांनी पाठवलेले साहित्य मिळाले. काही दिवस पडूनही राहिले.

एक दिवस दशरथ पाटील यांनी फोन केला. ११ डिसेंबरपासून ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचा योग आहे, तेव्हापासून ज्ञानेश्वरी हस्तलिखित करण्याचा उपक्रम सुरू करावा, अशी विनंती केली. त्यांना प्रतिसाद देत मानेंनी उपक्रम सुरू केला.

माने दुबईतील श्री गणेश भजन मंडळातील सदस्य आहेत. १५ ते २० लोक एकत्र येतात. ते मराठी कोकणवासी आहेत. भजन-कीर्तन करतात. सण-वा वाढदिवसाला एकमेकांकडे जातात. हस्तलिखित उपक्रमासाठी पुण्यातील ज्ञानेश्वरीचे अभ्यासक मधुसूदन महाराजांचे प्रोत्साहन मिळाले. अडचण येईल, तेव्हा ओव्यांचा अर्थ समजावून सांगितला. ‘नुसते लिहू नका, तर ते समजून घेऊन लिहिण्याचा प्रयत्न करा,’ असाही सल्लाही दिला. मानेंनी शेवटचा अध्याय इस्लामपूरमध्ये आईसमवेत राहून व भोरमधील आश्रमात पूर्ण केला.

दुबईत एकादशी!

येत्या २१ जुलैला आषाढी एकादशीनिमित्त दुबईत मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दुबईत असलेले मराठी व अन्य भारतीय असे दीड हजार लोक सहभागी होणार आहेत. सन २०१६ पासून एकादशीनंतरच्या रविवारी उत्सव केला जातो.

१२६ दिवस!

मानेंनी १२६ दिवसांत रोज पहाटे उठून चार ते पाच तास वेळ देऊन ही ज्ञानेश्वरी लिहून काढली. त्यात ९०३५ ओव्या, ७०० श्लोक व ५०० पाने आहेत. १७ एप्रिल २०२४ ला हे लेखन पूर्ण झाले.

चमत्कारावर विश्वास नाही. सतत कार्यरत राहा. अपेक्षित असलेल्या गोष्टी साध्य होतात, असा अनुभव या तुकाराम व संत ज्ञानेश्वरांच्या ग्रंथांतून मिळतो. उपक्रमामुळे एकाग्रता वाढली. अक्षरही सुधारले. अभ्यासाची ओढ लागली, असे ते म्हणतात. ‘ज्ञानेश्वरी’ व ‘तुकाराम गाथे’चा अभ्यास करणार आहे. यू ट्यूब, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून माहितीचा नको, त्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. ज्ञानेश्वर, तुकारामांनी जे वैराग्य सहन केले, जे काम करून ठेवले, ते सत्य पुढे आणण्याचा प्रयत्न असेल. त्यांचे काम वेगळ्या अर्थाने पुढे आणण्याचा प्रयत्न राहील. जुने साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध केले आहे. सध्या त्याचे वाचन सुरू आहे.

- नितीन माने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.