या प्रणालीमध्ये ईअर टॅगिंग (१२ अंकी बार कोडेड) केलेल्या पशुधनाच्या सर्व प्रकारच्या नोंदी घेण्यात येत आहेत.
इस्लामपूर : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून (Animal Husbandry Department) जनावरांना कानावर शिक्के (Ear Tagging) ३१ मार्चपर्यंत बंधनकारक करण्यात आले आहे. भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि ‘कानावर शिक्के’ असल्याशिवाय १ जून २०२४ नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री, उपचार केले जाणार नसल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या (Central Government) पशुसंवर्धन विभागाद्वारे नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशन (NDIM) अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमध्ये ईअर टॅगिंग (१२ अंकी बार कोडेड) केलेल्या पशुधनाच्या सर्व प्रकारच्या नोंदी घेण्यात येत आहेत. त्यामुळे जनावरांची जन्म-मृत्यूची नोंदणी, प्रतिबंधात्मक औषधोपचार, लसीकरण, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क, खरेदी-विक्रीची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे.
या माहितीच्या आधारे शेतकरी, पशुपालकांना शासनाच्या सुविधा, योजना, पशुधनासाठी आवश्यक असलेल्या सेवांचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे. शिवाय, या नोंदणीमुळे जनावरांमधील होणाऱ्या विविध आजारांची आगाऊ माहिती मिळाल्याने अन्य परिसरात प्रतिबंधात्मक उपाय राबवून पशुधनाची जीवित हानी टाळता येणार आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचा ईअर टॅग काढू नये अथवा तोडू नये. जनावराचा टॅग पडला असेल किंवा जनावरांची नवीन खरेदी केली असेल तर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये त्याची नोंदणी करून घ्यावी. भविष्यामध्ये येणाऱ्या पशुधनाच्या योजना यांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे.
-डॉ. अजय थोरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, सांगली
कत्तल रोखण्यासाठी चोरून जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर बंधन येणार
कोणत्याही प्रकारच्या जनावरांची ईअर टॅगिंगशिवाय वाहतूक केल्यास संबंधित वाहतूकदार, जनावरांचे मालक यांच्यावर कारवाई होणार आहे.
नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का, तसेच वन्य पशूंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचे टॅगिंग असल्याशिवाय मालकांना नुकसान भरपाई मिळणार नाही.
जनावरांच्या विक्रीकरिता वाहतूक करताना राज्यातील जनावरांचे टॅगिंग असल्याची खात्री करूनच पशुधन विकास अधिकारी, पशुसंवर्धन सहायक आयुक्त आरोग्य प्रमाणपत्र व वाहतूक प्रमाणपत्र देणार आहेत.
गाय वर्ग ३ लाख २४ हजार ७५६
म्हैस वर्ग ४ लाख ९३ हजार ९९८
शेळी वर्ग ४ लाख ५४ हजार १२५
मेंढी वर्ग १ लाख ३० हजार ७५४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.