मिरजेच्या वैद्यकीय जैव कचऱ्यातूनही कमाईचाच डाव

IMAच्या फसवणुकीसाठी प्रशासनाचा अचूक वापर
८० लाखांची यंत्रसामग्री गंजत पडून
८० लाखांची यंत्रसामग्री गंजत पडूनsakal
Updated on

मिरज: वैद्यकीयनगरी म्हणून देशात नावारूपाला आलेल्या मिरज शहरातील वैद्यकीय कचराही शहरातील कारभाऱ्यांना कमाईसाठीची संधी वाटत आहे. त्यासाठीच महापालिकेत संमत झालेले ठराव रद्द करण्याचा आणि बोगस कंपनीद्वारे यासाठीचा ठेका घेण्याचा हा खटाटोप याच कारभाऱ्यांनी केवळ वैद्यकीय कचऱ्यातील कमाईसाठी चालवला आहे.

ही बाब आता सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ, स्पष्ट असूनही महापालिकेतील मूठभर कारभाऱ्यांच्या विरोधात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांतील कोणीही नगरसेवक बोलायला तयार नाहीत. महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांच्या संगनमताने डॉक्टर आणि रुग्णांची राजरोसपणे होणारी ही लुबाडणूकच आहे.

आपल्या कचऱ्याची विल्हेवाट आपण स्वतः लावायची असते, असा अगदी साधा सोपा नियम डॉक्टर मंडळीसाठीही लागू आहे. याच नियमावर बोट ठेवून २०१४ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त अजीज कारचे, रवींद्र खेबुडकर यांनी वैद्यकीय जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीची जबाबदारी डॉक्टरांच्या इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) मिरजकडे सोपवली. त्यासाठी महापालिका आणि आयएमए यांच्यात करार होऊन हे काम सुरूही झाले; परंतु काही चाणाक्ष व्यावसायिकांनी महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून या कामात खोडा घातला आणि आयएमए संस्थेला जैविक भस्मीकरण केंद्रात सुधारणा करून घेण्यास सांगितले.

‘आयएमए’ने यासाठी तब्बल ऐंशी लाख रुपये मोजून अद्ययावत यंत्रसामग्री या ठिकाणी बसवली; तरीही महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी वैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीचे काम ‘आयएमए’ऐवजी एका खासगी ठेकेदाराला दिले. ऐंशी लाख रुपयांची फसवणूक करून शहरातील डॉक्टरांना पैशासाठी वेठीस धरण्याचा हा प्रयत्न आता मिरजेच्या नागरिकांनीच हाणून पाडायला हवा. महापालिकेतील अत्यंत किरकोळ मुद्यांवरही महासभेत गदारोळ उठवणाऱी महापालिकेतील नगरसेवक मंडळीही या विषयावर गप्प आहे. त्यामुळे हे एकाच माळेचे मणी आहेत, ही बाबही आता लपून राहिलेली नाही.

८० लाखांची यंत्रसामग्री गंजत पडून

गेल्या दहा वर्षांपासून शहरातील वैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न महापालिकेत टप्प्याटप्प्याने कमाईचा मामला म्हणून पुढे आला. एकीकडे ‘आयएमए’ने तब्बल ऐंशी लाख रुपये खर्च करून जैव कचरा भस्मीकरण केंद्रात बसवलेली अद्ययावत यंत्रसामग्री गंजत आहे; आणि दुसरीकडे याच कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी डॉक्टरांची प्रत्येक महिन्याला लूटमार सुरू आहे. महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून डॉक्टर आणि सामान्य रुग्णांच्या लूटमारीचा खेळ सामान्य नागरिकांच्या प्रखर विरोधानेच थांबू शकतो.

वैद्यकीय जैविक कचरा भस्मीकरण केंद्रातील परवानगीचा शासनाकडील प्रलंबित प्रस्ताव नव्याने मंजूर करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठपुरावा करून मंजूर करून आणणे सध्या प्राधान्यक्रमाचे काम आहे. हा प्रस्ताव लवकरच मंजूर व्हावा, यासाठी मी प्रयत्नशील आहे.

- दिग्विजय सूर्यवंशी, महापौर

वैद्यकीय जैव कचऱ्याच्या विल्हेवाटीची जबाबदारी मिरज ‘आयएमए’ने यापूर्वीच स्वीकारली आहे आणि ती सक्षमपणे पार पडण्यासाठीची सर्व तांत्रिक तयारी पूर्ण झाली आहे. आम्ही सनदशीर मार्गाने ही जबाबदारी नव्याने स्वीकारण्याचा प्रयत्न करीत आहोत.

- कार्यकारी मंडळ,आयएमए, मिरज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()