ED Action: राजारामबापू सहकारी बँकेच्या कार्यालयासह 14 ठिकाणी EDचे छापे

ईडीच्या अधिकाऱ्यानी घराची झडती घेवून महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहीती
ED Action
ED ActionEsakal
Updated on

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ईडीने छापेमारी सुरू केली आहे. सांगली शहरातील इलेक्ट्रिक साहित्याची विक्री करणाऱ्या सुरेश आणि दिनेश पारेख बंधू, अरविंद आणि ऋषिकेश लढ्ढा या चार बड्या व्यापाऱ्यांसह पिंटू बियाणी या व्यापाऱ्यावर काल ईडीच्या पथकांनी छापे टाकून तपासणी केली आहे.(Latest Marathi News)

आर्थिक अनियमिततेच्या संशयावरून हे छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ११ वाहनांमधून ६० अधिकारी या कारवाईसाठी सांगलीत दाखल झाले होते. तर या पथकासोबत आलेल्या सीआरपीएफच्या जवानांचा बंगल्यासमोर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (Latest Marathi News)

ED Action
Maharashtra Politics: 'आम्ही नवाब शरीफ यांचा केक कापला नाही...', फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचं प्रत्युत्तर

दरम्यान या छापेमारीवेळी गुप्तता पाळण्यात आली होती. शहरातील शासकीय रुग्णालयामागे त्रिकोणी बागेसमोर दिनेश पारेख आणि सुरेश पारेख या व्यापारी भावांचे शेजारी-शेजारी बंगले आहेत. दोघेही इलेक्ट्रिक साहित्याचे मोठे व्यापारी आहेत. दोघांच्या घरांवर काल (२३ जून) सकाळी ७ वाजता ईडीने छापा टाकला. त्यानंतर काही वेळात न्यू प्राइड मल्टिप्लेक्स शेजारच्या व्यंकटेशनगरातील अरविंद आणि ऋषिकेश लढ्ढा या इलेक्ट्रिक साहित्याच्या व्यापाऱ्यांच्या घरांवरही ईडीच्या पथकांचे छापे टाकले. यासोबतच पिंटू बियाणी या व्यापाऱ्यांच्या घरावरही ईडीच्या पथकांचे छापे टाकले. (Latest Marathi News)

ED Action
Maharashtra Politics : "केंद्र शासनाच्या माध्यमातून येणारी प्रत्येक गुंतवणूक दरवेळी गुजरातमध्येच का? महाराष्ट्रात…"

या पाच व्यापाऱ्याकडे चौकशी करताना ईडीने व्यापाऱ्याची खाती असलेल्या संबधित बँकेत देखील चौकशी केली आहे. यामध्ये पेठ येथील राजारामबापू पाटील सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातही जाऊन ईडीच्या एका पथकाने या व्यापाऱ्यांच्या खात्याबाबाबत चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्री अडीच वाजता ईडीचे अधिकारी संपूर्ण चौकशी आटपून मुंबईकडे रवाना झाले आहेत.(Latest Marathi News)

ED Action
Satara : राड्यानंतर दुसऱ्याच दिवशी उदयनराजेंनी असं काही केलं की, त्याचा तुम्हालाही हेवा वाटेल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.