BJP MP : माझ्यामागं ED लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार आहे; राष्ट्रवादीनं शेअर केला Video

गेल्या काही दिवसांपासून देशासह महाराष्ट्रात सक्तवसुली संचालनालय (ED) आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरोसह (CBI) केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी सुरू आहेत.
Sanjay Kaka Patil
Sanjay Kaka Patilesakal
Updated on
Summary

काल लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांवर आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागलमधील घरावर ED नं धाड टाकली आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशासह महाराष्ट्रात सक्तवसुली संचालनालय (ED) आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरोसह (CBI) केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी सुरू आहेत. या धाडी केवळ विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच पडत असून विरोधकांना दाबण्यासाठी तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधी नेत्यांनी केलाय.

या संदर्भात विरोधी पक्षाच्या नऊ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनाही पत्र लिहिलंय. त्यातच काल लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांवर आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागलमधील घरावर ED नं धाड टाकली आहे.

दरम्यान ईडी, सीबीआयच्या माध्यमातून राजकीय सुडबुद्धीनं कारवाई सुरू असल्याचा आरोप होत असतानाच भारतीय जनता पक्षाचे (BJP) सांगली मतदारसंघाचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील (Sanjay Kaka Patil) यांचा एक व्हिडिओ राष्ट्रवादीनं शेअर केला आहे.

Sanjay Kaka Patil
ED Inquiry : अजून किती त्रास देणार, गोळ्या मारून आम्हाला संपवून टाका; मुश्रीफांच्या पत्नीची संतप्त प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ ट्विट केलाय. यात भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी आपण भाजप खासदार असल्यामुळं आपल्या पाठीमागं ईडी लागणार नाही, असं विधान केलंय. यावरून तपासेंनी भाजपवर निशाणा साधलाय. आमचा संशय खरा ठरला, आता खुद्द खासदार संजयकाका यांनीच कबुली दिली. भाजपचं आता काही म्हणणं आहे का? विरोधकांच्या विरोधात केंद्रीय यंत्रणांचा वापर, असं कॅप्शनही महेश तपासेंनी या व्हिडिओला दिलंय. दरम्यान, हा व्हिडिओ दीड वर्षांपूर्वीचा असून याआधीही 24 ऑक्टोबर 2021 रोजी समोर आला होता. मात्र, पुन्हा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं संजयकाकांची गोची झाली आहे.

Sanjay Kaka Patil
ED Inquiry : अटक करणार नाहीत तर काय मुका घेणार का? मुख्यमंत्र्यांच्या लेकीबाबत भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.