सर्वसामान्यांना दिलासा; खाद्यतेलाच्या दरात 'इतक्या' रुपयांची घसरण

मागील वर्षाच्या नोव्हेंबरपासून खाद्यतेलाचे दर वाढत चालले होते
सर्वसामान्यांना दिलासा; खाद्यतेलाच्या दरात 'इतक्या' रुपयांची घसरण
Updated on

बेळगाव : कोरोना (covid-19) व लॉकडाउन (lockdown) काळात पेट्रोलने शंभरी गाठली असल्याने सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. मात्र, याचवेळी स्वयंपाक घरातील महत्वाचा घटक असलेल्या खाद्यतेलाचे (edible oil) दर काही प्रमाणात कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

मागील वर्षाच्या नोव्हेंबरपासून खाद्यतेलाचे दर वाढत चालले होते. तर काही दिवसांपूर्वी सूर्यफूल तेलाचे दर प्रति किलो २०० रुपयाच्या घरात पोचले होते. गेल्या ७ महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढत चालल्याने कुटुंबप्रमुखांचा खर्चही वाढला होता. मात्र, खाद्य तेलाचा दर प्रती किलो ७ रुपयापर्यंत कमी झाल्याने कोरोना व लॉकडाउन काळात नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

सर्वसामान्यांना दिलासा; खाद्यतेलाच्या दरात 'इतक्या' रुपयांची घसरण
PHOTO - ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असलेले राजापूरचे गंगातीर्थक्षेत्र

डिसेंबरअखेरीस खाद्यतेलाच्या दरात उच्चांकी वाढ झाली होती. तर मागीलवर्षी ऐन दिवाळीतही तेलाचे दर वाढलेले होते. यामुळे आधीच कोरोना व लॉकडाउनमुळे आर्थिक संकटात असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसला होता. दिवाळीनंतर तेलाचे दर कमी होतील, अशी अपेक्षा बाळगून असणाऱ्या नागरिकांचा भ्रमनिरास झाला. दिवाळीनंतरही खाद्यतेलाच्या दरात वाढ होत चालल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ऑगस्ट २०२० मध्ये १०० ते ११० रुपये प्रतिकिलो राहिलेल्या खाद्यतेलाचे दर १९० रुपये पार झाले होते. तर १५ किलो सूर्यफूल तेलाच्या डब्याच्या किंमतीने २,५०० रुपयाचा टप्पा ओलांडला होता. याबरोबरच सोयाबीन व पामतेलाच्या दरातही वाढ झाली होती.

सोयाबीन तेलाच्या डब्याचा दर २,४०० रुपयाहून अधिक तर पामतेल डब्याचा दर २ हजारापर्यंत पोहोचला होता. यामध्ये सध्या किमान ७ रुपये प्रति किलोपर्यंत दर कमी झाले आहेत. सध्या बऱ्याच देशात अनलॉक सुरु असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. यामुळे याठिकाणीही काही प्रमाणात दर कमी झाले आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

सर्वसामान्यांना दिलासा; खाद्यतेलाच्या दरात 'इतक्या' रुपयांची घसरण
कर्नाटकात कोणतंही राजकीय संकट नाही; खुद्द मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.