बेळगाव : नगरपालिकांचा आज फैसला; काही ग्रामपंचायतींचाही निकाल

मतमोजणीचे विक्रेंद्रीकरण केले असून तालुकास्तरावर मतमोजणी होणार आहे.
Election Result
Election Resultsakal
Updated on

बेळगाव : नगर स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायतींतील (Gram Panchayat) रिक्त जागांसाठी सोमवारी (ता. २७) मतदान झाले असून गुरूवारी (ता.३०) मतमोजणी आहे. मतमोजणीचे विक्रेंद्रीकरण केले असून तालुकास्तरावर मतमोजणी होणार आहे. त्यासाठी मतमोजणी केंद्रांवर बंदोबस्त वाढविला असून केंद्र परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी (१४४ कलम) जारी केला आहे. (Belgaon Election Updates)

ग्रामपंचायतीतील रिक्त जागांसाठी २७ रोजी जिल्हातील ग्रामपंचायतीत मतदान झाले. सुमारे ८३.७६ टक्के मतदान झाले आहे. तसेच नगर स्थानिक स्वराज्य संस्थेतील रिक्त जागांसाठीही २७ रोजी मतदान झाले. सुमारे ७८ टक्के मतदान झाले. चुरशीने पार पडलेल्या मतदानानंतर निकालाची उत्सुकता वाढली आहे. गुरुवारी लागणाऱ्या निकालाकडे अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.

Election Result
रत्नागिरी : मास्क लावण्यासाठी मंत्री सामंतांची गांधीगिरी

पहिल्यांदाच मतमोजणीचे विक्रेंद्रीकरण कऱण्यात आले असून प्रत्येक तालुक्यात मतमोजणी केंद्र स्थापण्यात आले आहे. या केंद्रांसाठी पोलिसांचे कडे निर्माण करण्यात आले असून १४४ कलम जारीचा आदेश जिल्हाधिकारी वेंकटेश कुमार यांनी गुरूवारी (ता.२९) बजाविला आहे. त्यासाठी मतमोजणी केंद्राच्या परिसरात ५ पेक्षा अधिक जण जमणे, हुल्लडबाजी वा मिरवणूक काढण्यावर निर्बंध घातले आहेत. जमावबंदी आदेश ३० डिसेंबर सकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत लागू असेल.

जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रे

तालुकास्थानिक स्वराज्य संस्थाप्रभाग

निपाणीबोरगाव नगरपंचायत१ ते १७

चिक्कोडीएकसंबा नगरपंचायत१ ते १७

अथणीनगरपरिषद१ ते २७

रायबागहारुगेरी नगरपरिषद१ ते २३

रायबागमुगळखोड नगरपरिषद१ ते २३ (२२ वगळून)

कागवाडउगार खुर्द नगरपरिषद१ ते २३

रायबागकंकणवाडी नगरपरिषद१ ते १८

रायबागचिंचली नगरपरिषद१ ते १९

कागवाडऐनापूर नगरपंचायत१ ते १९

कागवाडशेडबाळ नगरपंचायत १ ते १६

ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी केंद्रे

तालुका ग्रांमपंचायतसदस्य संख्या

बेळगाव बिजगर्णी१४

बेळगाव बेळवट्टी११

अथणी सवदी२०

रायबाग सिध्दापूर९

रायबागयड्राव८

रायबाग यल्पारट्टी१०

रामदूर्ग तुरनूर१०

रामदूर्ग हलगत्ती११

पोटनिवडणूक मतमोजणी केंद्र

तालुका*ग्रामपंचायत प्रभांग

बेळगावउचगाव२

बेळगावयेळ्ळूर८

बेळगावगौंडवाड(कंग्राळी बी. के.)१३

बेळगावकंग्राळी बी. के. १०

बेळगावबाळेकुंद्री बी. के.१

निपाणीभोज१०

तालुकाकेंद्रप्रभांग

कागवाडशिरगुप्पी३

खानापूरभुरणकी४

चिक्कोडीहिरेकोडी७

चिक्कोडीकेरुर४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.