सोलापूर शहर उत्तरमधून पालकमंत्री देशमुख आघाडीवर | Election results 2019

vidhansabha results 2019
vidhansabha results 2019
Updated on

सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री तथा भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांना 56 हजार मतांचे मताधिक्य मिळाले आहे. दुसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीच्या आनंद चंदनशिवे यांनी मुसंडी मारली आहे. चंदनशिवे यांना 20 हजार तर राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांना 12 हजार मते मिळाली आहेत. या विधानसभा निवडणुकीत एक लाख मतांनी पालकमंत्री देशमुख यांना विजयी करण्याचा निर्धार भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला होता. त्यादृष्टीने पालकमंत्री देशमुख यांच्या मताधिक्याची वाटचाल सुरू असल्याचे समोर येऊ लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री श्री. देशमुख यांनी जिल्हा आणि राज्यातील प्रचार यंत्रणेत सहभाग नोंदवला. त्यामुळे शहर उत्तर मतदारसंघाची जबाबदारी ही डॉ. किरण यांच्यावर टाकण्यात आली आणि त्यांनीही ती यशस्वीपणे पेलून दाखवली. "बाप से बेटा सवाई...'या उक्तीप्रमाणे गत निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्‍यापेक्षा जास्त मताधिक्‍य मिळवण्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. किरण यांचे नाव पुढे येऊ लागले आहे.

लोकसभा निवडणूकीचा आढावा

लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांना तब्बल 63 हजार 667 मताधिक्‍य मिळवून देत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री विजय देशमुख (थोरले मालक) यांनी मतदारसंघावरील आपली पकड किती मजबूत आहे हे दाखवले .

सोलापूर दक्षिण मतदारसंघातून सहकार मंत्री आघाडीवर

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना 11 व्या फेरीअखेर आठ हजार 141 मतांची आघाडी मिळाली आहे त्यांना चाळीस हजार 657 तर काँग्रेसचे बाबा मिस्त्री यांना 32 हजार 516 मते मिळाली आहेत आत्तापर्यंत 82 हजार 683 मतांची मतमोजणी पूर्ण झाली आहे हा मतदारसंघ शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये विभागला आहे आतापर्यंत ग्रामीण भागातील मतमोजणी सुरू होती आता शहरी भागातील मतमोजणी सुरू झाली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()