कोकरुड - शिराळा पश्चिम भागात ऋतू चक्राच्या लहरीपणामुळे व अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ऐन हिवाळ्यात थंडी गायब होऊन पाऊस पडत असल्याने हवामानामध्ये बदल पहायला मिळत आहे. कधी ऊन कधी पाऊस तर कधी दाटून आलेले ढग त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात श्रावण महिन्यांच फिलिंग जाणवायला लागले आहे. यामुळे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात अंगाला झोंबणारी गुलाबी थंडी गायब झाली आहे.
या बदलत्या वातावरणामुळे पुन्हा सर्दी, खोकल्यांचे प्रमाण वाढले आहे. सध्या डिसेंबर सुरू झाला असला तरी पावसाळी वातावरण आसल्याने हवामानात माेठा बदल पहायला मिळत आहे.
गेल्या आठवड्यात देखील कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला. मधल्या काही दिवसात विश्रांती घेत बुधवार रात्रीपासून पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकरी वर्गाच्या अडचणीत वाढ झाली असून धुवांधार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ऊस उत्पादक शेतकरी आपल्या शेतातील ऊस घालवण्यासाठी प्रयत्नशील असताना पावसामुळे शेतात सुरू असलेली ऊस तोडणी बंध पडली असून काही ठिकाणी तोडलेला ऊस चिखल झाल्याने शेतातच अडकून पडला आहे.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे वारणा काठचा शेतकरी अगोदरच पिचला गेला आहे. महापुरातुन उरला सुरला खरीप काढून मोकळा होतोय तोवर पुन्हा पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीच्या मशातीची कामे लांबणीवर पडणार आहेत. त्यामुळे डिसेंबर मध्ये होणाऱ्या ऊस लागणी पुढे ढकलणार आहेत.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अनुभवायला मिळणारी गुलाबी थंडी गायब झाली असून डिसेंबर सुरू झाला तरी अपेक्षित प्रमाणात थंडी सुरू झाली नसल्याने पावसाळा आणि उन्हाळा अनुभवायला मिळत आहे.
ऊस तोडणी मजुरांचे हाल
बुधवारी रात्री सुरू झालेल्या पावसामुळे ऊस तोडणी मजुरांचे हाल सुरू असून पोटाची खळगी भरण्यासाठी कोसो दूर आलेले ऊसतोड कामगार अक्षरशः उघड्यावर पडले आहेत. पावसामुळे खोपटात पाणी जाऊन चारीबाजूला चिखल झाल्यामुळे पाय ठेवायला देखील कोरडी जागा शिल्लक राहिली नाही. त्यामुळे बुधवारची रात्र त्यांना जागत काढावी लागली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.